आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करते एक रत्न, जाणून घ्या कोणी धारण करावे

Published:
रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशीनुसार कोणते रत्न धारण करावे आणि कोणते रत्न धारण करू नये याबाबत सांगितले आहे. योग्य रत्न धारण केल्यास त्याचा योग्य फायदा त्या व्यक्तीला मिळतो.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करते एक रत्न, जाणून घ्या कोणी धारण करावे

Gemstones to gain confidence:   वास्तु शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रसुद्धा अतिशय प्राचीन आणि तितकेच महत्वाचे शास्त्र आहे. रत्न शास्त्रामध्ये रत्नाच्या मदतीने ग्रहांची स्थिती मजबूत करण्यास मदत होते. लोकांना असणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी आणण्यासाठी रत्ने धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो.

परंतु रत्न शास्त्र प्रत्येक व्यक्तीला तेच रत्न धारण करण्याचा सल्ला देत नाही. कारण रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशीनुसार कोणते रत्न धारण करावे आणि कोणते रत्न धारण करू नये याबाबत सांगितले आहे. योग्य रत्न धारण केल्यास त्याचा योग्य फायदा त्या व्यक्तीला मिळतो. त्यामुळे नेहमीच जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानेच कोणतेही रत्न धारण करावे. आज आपण आत्मविश्वास वाढविणाऱ्या रुबी या रत्नाबाबत जाणून घेणार आहोत. शिवाय हे रत्न कोणी धारण करावे याबाबतही जाणून घेऊया….

 

रुबी धारण करण्याचे फायदे-

 

आत्मविश्वास वाढविण्यास मदत-
रत्न शास्त्राप्रमाणे रुबी एक अत्यंत मौल्यवान रत्न आहे. रुबी धारण केल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याच्या वापराने लोकांना स्वतःमधील क्षमता ओळखण्यास मदत होते. शिवाय रुबी धारण केल्याने व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची भावना जागृत होण्यास मदत मिळते. त्यामुळे आत्मविश्वास कमी असणाऱ्या व्यक्तीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने रुबी धारण करणे फायदेशीर ठरते.

तणाव कमी करते-
रत्न शास्त्रानुसार, रुबी धारण केल्याने लोकांना मानसिक फायदासुद्धा मिळतो. या रत्नाच्या वापराने व्यक्तीमधील तणाव दूर होऊन मानसिक समाधान मिळते. शिवाय डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला पुन्हा नवी ऊर्जा देण्यास मदत करते. त्यामुळे ताणतणाव दूर करण्यासाठी रुबी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

आर्थिक लाभ-
रत्न शास्त्रानुसार, रुबी सुखसमृद्धी आकर्षित करण्यास मदत करते. त्यामुळे रुबी धारण केल्यास धनलाभ होऊन आर्थिक अडचणी दूर होतात. घरात सुखसमृद्धी येते. करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळते. तसेच व्यवसायात सुखसमृद्धी येते.

 

रुबी कोणी धारण करावा?

रत्न शास्त्रानुसार रुबी सरसकट सर्वांनी धारण करू नये. असे केल्यास त्याचा योग्य फायदा मिळणार नाही. तज्ज्ञांच्या मते रुबी मेष आणि धनु राशीच्या लोकांनी धारण करणे चांगले असते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews