Marathi News

Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार समाजात मूर्ख समजले जातात ३ प्रकारचे लोक, आजच सोडा या सवयी

Published:
आचार्य चाणक्यांच्या मते फक्त शिक्षण घेऊन फायदा नाही त्यासाठी विवेकबुद्धी जागृत असणे गरजेचे आहे.
Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार समाजात मूर्ख समजले जातात ३ प्रकारचे लोक, आजच सोडा या सवयी

Chanakya Niti In Marathi:   शिक्षण मनुष्याला ज्ञान देऊ शकते पण त्याला कसे वागायचे हे नाही सांगू शकत. कारण ते मनुष्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असते. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला चूक आणि बरोबर यातील स्वतःच समजता आला पाहिजे. अनेकदा लोक उच्च शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना काही गोष्टी समजता येत नाहीत. यासाठी विवेकबुद्धी असणे गरजेचे आहे.

आचार्य चाणक्यांच्या मते फक्त शिक्षण घेऊन फायदा नाही त्यासाठी विवेकबुद्धी जागृत असणे गरजेचे आहे. चाणक्य नीतीनुसार मनुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे त्याला समाजात मूर्ख समजले जाते. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते माहिती असणे आवश्यक आहे. कारण या गोष्टींमुळे तुम्हालासुद्धा समाजात मूर्ख समजले जाऊ शकते. आज आपण आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया….

 

स्वतःला सर्वज्ञानी समजणारे लोक-

आचार्य चाणक्यांच्या मते समाजात असे काही लोक असतात जे स्वतःला खूप ज्ञानी समजत असतात. अशा लोकांना इतर सर्व लोक आपल्यापेक्षा अज्ञानी आहेत असेच वाटते. असे लोक सतत प्रत्येक गोष्टीवर ज्ञान देत असतात. परंतु त्यांच्या पाठीमागे त्यांना मूर्ख समजले जाते. अशा लोकांना समाजात दुर्लक्ष केले जाते.

 

इतरांना कमीपणा दाखवणारे लोक-

आचार्य चाणक्यांच्या मते, असे अनेक लोक असतात जे दीनदुबळ्या, गरीब आणि कमकुवत लोकांना कमीपणा दाखवत असतात. अशा लोकांना आपल्यापेक्षा कमकुवत लोकांना कमीपणा दाखवण्यात मोठेपणा वाटतो. परंतु अशा लोकांची प्रतिमा समाजात चांगली नसते. अशा लोकांना मूर्ख समजले जाते. त्यांना मानसन्मान किंवा आपुलकी मिळत नाही.

 

स्वतःचे कौतुक करणारे लोक-

चाणक्य नीतीनुसार स्वतःचे कौतुक करणारे लोक समाजात मूर्ख समजले जातात. असे अनेक लोक असतात ज्यांना स्वतःची स्तुती करायला खूप आवडते. असे लोक इतरांच्या समोर नेहमीच स्वतःबद्दल कौतुक करत असतात. पण अशा लोकांना मूर्ख समजले जाते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews