फेंगशुई शास्त्रानुसार घरात ठेवा ‘ही’ रोपे, सकारात्मकता येण्यास मिळते मदत

Published:
फेंगशुईशास्त्रामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी आणि पैसा येण्यासाठी अनेक टिप्स सांगितल्या जातात.
फेंगशुई शास्त्रानुसार घरात ठेवा ‘ही’ रोपे, सकारात्मकता येण्यास मिळते मदत

Feng Shui Tips In Marathi:  वास्तू शास्त्रानुसार बऱ्याचवेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दिसून येते. नकारात्मक ऊर्जेमुळे घराची प्रगती होण्यास अडचण येते. यामुळे घरात आर्थिक चणचण, कार्यक्षेत्रात अडचणी, व्यवसायात नुकसान, आरोग्य बिघडते अशा अनेक तक्रारी होत असतात.

त्यामुळेच घरात सकारात्मक ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे घरात सुखसमृद्धी आणि प्रगती दिसून येते. अनेक लोक घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी फेंगशुईची मदत घेतात. फेंगशुईनुसार अशा काही वनस्पती असतात ज्या घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. चला जाणून घेऊया या वनपस्ती नेमक्या कोणत्या आहेत…

अनेक वर्षांपासून चीन, जपान सारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये फेंगशुई शस्त्राचा वापर केला जात आहे. अलीकडच्या काळात आपल्या देशातसुद्धा अनेकजण फेंगशुई टिप्स फॉलो करतात. फेंगशुईमध्ये घरामध्ये सुखसमृद्धी आणि पैसा येण्यासाठी अनेक टिप्स सांगितल्या जातात.

घरात कोणती रोपे लावल्यास सकारात्मकता येते-

जेड प्लांट-

फेंगशुई शास्त्रानुसार, वेळूच्या रोपाप्रमाणेच जेड प्लांट ठेवणे अत्यंत चांगले समजले जाते. खासकरून घराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवणे उत्तम असते. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरात सुखसमृद्धी येऊन आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.

 

मनी प्लांट-

आजकाल प्रत्येकजण मनी प्लांट आपल्या घरात ठेवते. मनीप्लांटसुद्धा फेंगशुई शास्त्रानुसार सुखसमृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. मनी प्लांट घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. त्यामुळे घरातील अडचणी दूर होतात. शिवाय आर्थिक गोष्टींमध्ये प्रगती होते.

 

वेळूचे रोप-

फेंगशुई शास्त्रानुसार घरामध्ये वेळूचे रोप लावल्यास सुखसमृद्धी येते. घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला हे रोप तुम्ही ठेऊ शकता. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरामध्ये आर्थिक चणचण भासत नाही. शिवाय विविध कार्यांमध्ये प्रगती दिसून येते. तसेच अडचणी दूर होण्यास मदत मिळते.

 

पीस लिली-

फेंगशुईनुसार हे रोपसुद्धा तितकेच फायदेशीर आहे. तुम्हाला आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हे रोप लावले पाहिजे. शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा राहिल्याने प्रगती होण्यास दत्त होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews