Marathi News

अमरनाथच्या गुहेत आजही आहे अमर कबुतरांची जोडी? जाणून घ्या; पौराणिक कथा

Published:
अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांच्या संबंधित आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक रहस्यमय तसेच पौराणिक कथा आहेत.
अमरनाथच्या गुहेत आजही आहे अमर कबुतरांची जोडी? जाणून घ्या; पौराणिक कथा

अमरनाथ यात्रा ही केवळ तीर्थयात्रा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि गूढतेचा संगम आहे. दरवर्षी लाखो भाविक बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचतात. पण या प्रवासादरम्यान एक रहस्य देखील आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान गुहेत कबुतरांची जोडी दिसणे, हे केवळ भगवान शिवाचे आशीर्वाद लाभलेल्यांनाच शक्य होते, असा समज आहे. यात्रेकरूंमध्ये असा विश्वास आहे की, ज्यांना ही कबुतरांची जोडी दिसते, त्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो. 

शिव-पार्वती आणि अमर पक्ष्यांची कथा

पौराणिक कथेनुसार, भगवान शिव नेहमी माता पार्वतीला सृष्टीची उत्पत्ती आणि अमरत्वाचे रहस्य सांगू इच्छित होते. पण त्यांना असे वातावरण हवे होते जिथे कोणीही त्यांचे बोलणे ऐकू शकणार नाही. म्हणून, त्यांनी एका निर्जन ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि अमरनाथ गुहेची निवड केली. या प्रवासात, त्यांनी नंदी पहलगाम येथे, चंद्र चंदनवाडी येथे आणि इतर पाच तत्वांना (पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश) पंजतरणीजवळ सोडले. त्यानंतर, ते गुहेत पार्वतीसोबत गुप्तपणे प्रवेश केला.

गुहेत, शिवाने पार्वतीला अमरकथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगताना, त्यांनी कबुतरांच्या दोन जोडीला पाहिले, जे तिथे आधीपासूनच उपस्थित होते. ते दोघेही त्यांची कथा ऐकत होते. शिवाने जेव्हा अमरत्वाचे रहस्य सांगितले, तेव्हा ते दोन कबूतरही अमर झाले, कारण त्यांनीही ती कथा ऐकली होती. असे मानले जाते की, आजही ते दोन कबूतर त्या गुहेत आहेत आणि अमरनाथांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्यांचे दर्शन घडते. 

अमर पक्षी कोणाला पाहता येतात?

अमरनाथ यात्रेदरम्यान, ‘अमर पक्षी’ केवळ त्यांनाच दिसतात ज्यांच्यावर बाबा बर्फानीची विशेष कृपा असते, अशी धार्मिक मान्यता आहे. हे कबूतर अमरनाथ गुहेत दिसतात आणि त्यांना ‘अमर’ मानले जाते. अमरनाथ गुहेत, नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाजवळ, कबुतरांचे एक जोडपे नेहमी दिसते, असे सांगितले जाते. असे मानले जाते की, या कबुतरांनी एकदा भगवान शंकराची कथा ऐकली आणि ते अमर झाले. या कबुतरांना पाहणे म्हणजे बाबा बर्फानीची विशेष कृपा मानली जाते. ज्या भाविकांवर बाबा बर्फानीची कृपा असते, त्यांनाच हे कबूतर दिसतात. यात्रेकरूंनी गुहेच्या आत आणि आसपास कबूतरं पाहिले असल्याचा दावा केला आहे. अनेक भाविक या कबुतरांना अमरत्वाचे प्रतीक मानतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews