What remedies should be done if there is a problem in marriage: हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला विशेष महत्व आहे. वास्तू शास्त्र हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे. वास्तूशास्त्राच्या मदतीने तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये यश आणि सुखसमृद्धी मिळवू शकता. तसेच घरामध्ये वास्तू दोष असेल तर प्रत्येक गोष्टींमध्ये काही ना काही अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या विवाहातसुद्धा अडचण होऊ शकते. वास्तुदोषामुळे लग्न जुळण्यात अडचणी येतात.
विवाह दोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होते. हे वास्तू नियम नेमके कोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊया…
भिंतीचा रंग-
वास्तू शास्त्रानुसार, लग्न करू इच्छित असणाऱ्यानीं नेहमी लाकडी पलंगचा वापर करावा. तसेच अंथरुणाखाली धातू किंवा लोखंडी वस्तू ठेवणे टाळावे.तसेच खोलीत नेहमीच स्वच्छता ठेवावी. खोलीमधील भिंतींचा रंग नेहमीच हलका असावा. भिंतींचा रंग गडद असेल तर नकारात्मकता येते.
दिशासंबंधित उपाय-
वास्तू शास्त्रानुसार, घरातील दक्षिण-पश्चिम दिशा व्यवस्थित ठेवाव्यात. तसेच घराच्या या कोपऱ्यात रोझ क्वार्टजपासून बनलेले लव्ह बर्ड्स किंवा कबुतर ठेवावे. या उपायाने लवकर विवाह ठरण्यास मदत होते. परंतु तुमचे स्वयंपाकघर उत्तर-पूर्व दिशेत असू नये. कारण यामुळे विवाह ठरण्यात अडचणी येतात.
खोलीमध्ये काय ठेवावे आणि काय नाही?
वास्तू शास्त्रानुसार, विवाह करू इच्छित असणाऱ्यांनी आपल्या खोलीतील उत्तर दिशेच्या भिंतीवर शिव-पार्वती, राधाकृष्ण यांचे फोटो लावावे. असे केल्याने विवाह योग लवकर जुळून येतात. तसेच घरामध्ये काटेदार रोपे ठेवणे टाळावेत. तसेच अशा लोकांनी खोलीमध्ये आरसा, कात्री, चाकू अशा धारदार वस्तू ठेऊ नयेत. अशाने विवाहात अडचणी येतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






