अशोकाचे झाड दूर करते वास्तु दोष, सुखसमृद्धीसाठी जाणून घ्या विविध उपाय

Published:
वास्तु शास्त्रानुसार अशोकाच्या झाडाची मुळे धनलाभासाठी अत्यंत महत्वाची आहेत.
अशोकाचे झाड दूर करते वास्तु दोष, सुखसमृद्धीसाठी जाणून घ्या विविध उपाय

Vastu Tips for Ashoka tree:  हिंदू धर्मात काही झाडांची पाने विविध धार्मिक कार्यांमध्ये वापरली जातात. तसेच या झाडांच्या पानांचा वापर करून काही वास्तु उपाय केल्यास घरातील अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी येण्यास मदत होते.

हिंदू धर्मात अशोकाच्या झाडाला विशेष महत्व आहे. अशोकाच्या झाडाच्या पानांचा वापर करून अनेक वास्तु उपाय केले जातात. अशोकाच्या पानाने अनेक वास्तु दोष दूर होतात. तसेच घरातील आर्थिक चणचण दूर होऊन, घरात सुखसमृद्धी येण्यास मदत होते. आज आपण घरात सुखसमुद्धी येण्यासाठी अशोकाच्या पानांपासून कोणते वास्तु उपाय करायचे ते जाणून घेऊया….

 

लाल कपड्यात गुंडाळून ठेवा-

वास्तु शास्त्रानुसार घरात अशोकाची पाने ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरात सुखसमृद्धी येते. यासाठी शुक्रवारी अशोकाची ११ पाने एका लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभ होतो.

अशोकाची मुळे-
वास्तु शास्त्रानुसार अशोकाच्या झाडाची मुळे धनलाभासाठी अत्यंत महत्वाची आहेत. चांगला मुहूर्त पाहून झाडाची मुळे घरी घेऊन या. त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.. नंतर ती तिजोरीत ठेऊन द्या. असे केल्याने आर्थिक टंचाई दूर होऊन धन आकर्षित होईल.

पानांचे तोरण-
तुम्हाला व्यापारात-व्यवसायात प्रगती आणि सुखसमृद्धी हवी असेल, तर अशोकाच्या पानांचे तोरण करून ऑफिसच्या मुख्य दरवाजाला लावा. असे केल्याने आर्थिक फायदा होतो.

पूजेमध्ये पानांचा वापर-
ज्या मुलांचे अभ्यासात मन नाही लागत. मन एकाग्र होण्यास अडचण येते. अशा मुलांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी. असे केल्याने बुद्धी आणि एकग्रतेमध्ये वाढ होते.

 

अशोकाला जल अर्पण करा-

तसेच अशोकाच्या झाडाला दररोज जल अर्पण केल्याने माता भगवती प्रसन्न होते. वास्तु शास्त्रानुसार अशोकाच्या झाडाला दररोज जल अर्पण केल्याने मानसिक आजार, घरातील वादविवाद आणि कर्जापासून आराम मिळवण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews