सणासुदीच्या काळात आंब्यांच्या पानांचे तोरण हे घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येते. आता दिवाळीला तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधणार असाल तर त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. तोरणात आंब्याची पाने नेमकी किती असावी आणि त्याचे महत्त्व काय? जाणून घेऊयात…
तोरणात किती आंब्याची पाने असावीत?
दिवाळीच्या तोरणात आंब्याची पाने 5, 7, 11 किंवा 21 या संख्येत लावणे शुभ मानले जाते, कारण ही संख्या सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणते असे मानले जाते. आंब्याची पाने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि घराला शुद्ध करतात, त्यामुळे ही पाने वापरणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पूजेतही आंब्याची पाने जरूर वापरली जातात.
आंब्याच्या पानांचे महत्व
हिंदू धर्मात आंब्याच्या पानांना विशेष स्थान आहे. आंब्याची पाने ही पूजा कार्यामध्ये देखील वापरली जातात. दिवाळीसारख्या पवित्र सणांना घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लटकवणे शुभ मानले जाते. हे तोरण धार्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहे कारण ते देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे प्रतीक आहे असे मानले जाते. पानांचा हिरवा रंग आणि त्यांचा नैसर्गिक गुणधर्म यामुळे हवा शुद्ध राहते आणि घरात ताजेपणा येतो. आंब्याची पाने देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जातात आणि वाईट शक्तींना दूर ठेवण्यास मदत करतात.
यंदा दिवाळी कधी?
दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी अमावस्या 20 ऑक्टोबरला सुरू होऊन 21 ऑक्टोबरपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजेच, सोमवारी साजरी केली जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






