रस्त्यावर पडलेल्या या वस्तू चुकूनही ओलांडू नका, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Published:
रस्त्यावर काही वस्तू पडलेल्या असतील तर त्या चुकूनही ओलांडू नका. नारळ, हळद-कुंकू, पैसे किंवा इतर पूजेचे साहित्य रस्त्यावर पडलेले दिसल्यास ते ओलांडणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात
रस्त्यावर पडलेल्या या वस्तू चुकूनही ओलांडू नका, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जेव्हा आपण रस्त्यावरून जातो तेव्हा आपले लक्ष सहसा रहदारी, मोबाईलवर असते. पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की रस्त्यावर पडलेल्या काही गोष्टी आपल्यासाठी अशुभ संकेत असू शकतात. रस्त्यावर पडलेल्या काही गोष्टी ओलांडू नयेत. असे मानले जाते की या गोष्टी ओलांडल्याने आपल्या जीवनात दुर्दैव, आर्थिक त्रास किंवा मानसिक ताण येऊ शकतो. कोणत्या गोष्टी ओलांडण्यापासून टाळल्या पाहिजेत आणि त्यामागील कारणे काय आहेत ते जाणून घेऊया…

नारळ आणि लिंबू

रस्त्यावर नारळ किंवा लिंबू पडलेले दिसल्यास, ते चुकूनही ओलांडू नये. असे करणे अशुभ मानले जाते आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते. जर तुम्ही नकळत अशा गोष्टी ओलांडल्या तर असे मानले जाते की नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि तुम्हाला मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या हानी पोहोचवू शकते.

पूजा साहित्य

रस्त्यावर पडलेल्या पूजेच्या साहित्याला चुकूनही ओलांडू नये. असे करणे अशुभ मानले जाते. विशेषतः लिंबू- मिरची, नारळ, हळद, कुंकू, सिंदूर, तसेच जळलेली अगरबत्ती किंवा धूपबत्तीची राख रस्त्यावर पडलेली दिसल्यास ती ओलांडणे टाळावे. ज्योतिष शास्त्रानुसार, रस्त्यावर पडलेल्या या वस्तू नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि त्या ओलांडल्याने तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. 

लिंबू आणि मिरची

अनेकवेळा रस्त्यावरुन चालताना लिंबू मिरची पडलेली दिसते. जर लिंबू मिरची रस्त्यावर पडलेली दिसेल तर तिला ओलांडू नका किंवा स्पर्ष करू नका. त्यावर जर तुमचा पाय पडला तर नकारात्मक उर्जेचा जीवनावर प्रभाव पडतो आणि जीवनात विविध अशुभ घटना घडू लागतात. तुमच्या कामात अडचणी उभ्या राहतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews