Marathi News

Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश…

Published:
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि दिव्यांचा सण...त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.
Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश…

वसुबारसनंतर दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. साडेतीन मुहूर्तापैकी एक असून यादिवशी सोने खरेदीसोबत कार, गाडी खरेदी करण्यात येते. यंदा 18 ऑक्टोबर 2025 ला असणार आहे.  या सणाचा आनंद वाढवण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या विशेष शुभेच्छा…

धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा करण्याचं महत्त्व

धनत्रयोदशीचा दिवशी धन्वंतरीची पूजा करुन आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा, अशी मागणी केली जाते. धन्वंतरीची कृपा मिळवण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा केल्यामुळे वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. रोगांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीचा जन्म आयुर्वेदिक औषधांच्या निमिर्तीसाठी झाला. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली.

धनत्रयोदशी निमित्त खास शुभेच्छा संदेश..

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाचा प्रकाश तुमचे जीवन उजळून टाको
आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने
समृद्धी आणि यश मिळो.
धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा…!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!

धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हीच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.!

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

जीवनात फक्त प्रकाश असावा
तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत
देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो
सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा…!

जीवनात आनंद नांदो
लक्ष्मी देवीच्या कृपेने
धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews