दिवाळीच्या आनंदात तुमच्या घरात नव्या पाहुण्यांचं आगमन होऊन आनंद द्विगुणित झाला असेल. तर तुमच्या बाळांसाठी दिवाळीशी संबंधित हटके नावं तुम्ही देऊ शकता…
मुलींची नावे
- श्रीदा : हे नाव दैवी आकृती (देवी लक्ष्मी) दर्शवते जी लोकांना संपत्ती आणि समृद्धी देते.
-
अर्चिशा : दिवाळीदिनी घरी लक्ष्मीचं आगमन झालं असेल तर तुम्ही तिचं नाव अर्चिशा ठेवू शकता. हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ प्रकाशकिरण आहे.
- रिद्धिषा : रिद्धी म्हणजे संपत्ती आणि ईशा म्हणजे देवी.धनाची देवी म्हणजेच देवी लक्ष्मी या शुभ नावाने ओळखली जाते.
- प्रतिमा : याचा अर्थ वैभव, सौंदर्य किंवा प्रकाशाचा किरण असा होतो.
- आर्ची : मुलीसाठी आर्ची हे नाव संस्कृतमध्ये ज्योत किंवा प्रकाश किरण दर्शवते.
- सेरा : हेनाव पाणी, प्रकाश आणि सूर्यासह निसर्गातील घटकांचे प्रतिनिधित्व करते.
- दीपाली : दिव्यांची माळ.
- रोशनी : प्रकाश आणि तेज.
- लक्ष्मी : समृद्धी आणि संपत्तीची देवी.
- दीपिका : एक छोटा दिवा.
- सौदामिनी : वीज किंवा तेजस्वी प्रकाश
मुलांसाठी नावे
- दिपक : दिव्यासारखा प्रकाश देणारा.
- दर्शन : शुभ आणि आनंदी क्षण.
- राकेश : तेजस्वी आणि प्रकाशमान.
- अक्षत : ज्याला कधीही कमीपणा येऊ शकत नाही.
- अहान : याचा अर्थ आहे प्रकाशाचं पहिलं किरण. दिवाळी प्रकाशाचा सण. दिवाळीत जन्माला आलेल्या मुलासाठी हे नाव योग्य आहे.
- दिव्यांश : दिव्यांशचा अर्थ प्रकाश. त्यामुळे तुम्हाला दिवाळीला मुलगा झाला असेल तर तुम्ही त्याचं नाव दिव्यांश ठेवू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






