Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मी पूजनाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते? जाणून घ्या शुभ मुहूर्त…

Published:
दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन... यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी आहे आणि पूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभ मुहूर्त आहे. पण पूजा कशी करावी याबद्दल जाणून घ्या..
Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मी पूजनाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कोणते? जाणून घ्या शुभ मुहूर्त…

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या काळात सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते. हिंदू धर्मात दिवाळीला अधिक महत्त्व आहे. दिवाळीचा सण हा देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय असणार आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त, पूजा साहित्य आणि पूजा विधी.

लक्ष्मी पूजन कधी?

20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी अमावास्या तिथी सुरू होणार असून, 21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी अमावास्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार, लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल.

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे 21 ऑक्टोबर, संध्याकाळी  6 वाजून 10 मिनिटे ते 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. या काळात तुम्ही घरात ऑफिस किंवा तुमच्या दुकानात विधिवत लक्ष्मीपूजा करू शकता.

लक्ष्मी पूजनासाठी प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) आणि वृषभ काल (स्थिर लक्ष्मीचा काळ) सर्वात शुभ मानला जातो. आज लक्ष्मीपूजन करण्यासाठी संध्याकाळी 7.41 वाजेपासून ते रात्री 9.41 वाजेपर्यंत सर्वोत्तम शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच प्रदोष काळ हा संध्याकाळी 6.12 ते 8.40 पर्यंत असणार आहे.

  • लक्ष्मीपूजन (शुभ मुहूर्त) सायंकाळी 6:10 ते 8:40
  • प्रदोष काळ सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांचा काळ
  • अमावास्या तिथीची सुरुवात 20 ऑक्टोबर 2025, दुपारी 3:44
  • अमावास्या तिथीची समाप्ती 21 ऑक्टोबर 2025, सायंकाळी 5:54
  • लक्ष्मीपूजनाची तारीख 21 ऑक्टोबर 2025
  • यंदा लक्ष्मीपूजनासाठी साधारण 2 तास 24 मिनिटांची वेळ असेल.

लक्ष्मी पूजन साहित्य

१ चौरंग , लाल कापड, हळदी- कुंकू, गंध, सुपारी, लवंग, अगरबत्ती, दिवा, तूप, गंगाजल, पंचामृत, सुट्टी फुले, लक्ष्मी- गणेशाची मूर्ती, लक्ष्मी यंत्र, फळे, कापूर, कापूस, बत्ताशे, चांदीची नाणी, कलश, नारळ, देठाची पाने, पेढे, फराळ, कमळाचे फूल, आंब्याची पाने, , धूप, ताम्हण

लक्ष्मी पूजेची तयारी

  • लक्ष्मी व गणपतीची मूर्ती पूर्वमुखी किंवा पश्चिममुखी ठेवावी. लक्ष्मीजीच्या उजव्या बाजूला गणपती ठेवावा, आणि समोर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून त्यावर मूर्ती ठेवाव्यात.
  • गंगाजल शिंपडून पूजा जागेची शुद्धी केली जाते. नंतर संकल्प केला जातो. कोणतीही पूजा गणेश पूजनाशिवाय पूर्ण होत नाही. प्रथम गणपतीला कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा केली जाते.
  • देवीला फुले, सुवासिक फुले, हार, नैवेद्य अर्पण केला जातो. चांदी/सोनं/नवीन नोटा यांची पूजा केली जाते. पुस्तकं, हिशोबाची वही सुद्धा पूजली जाते.
  • लक्ष्मी-गणपतीची आरती केली जाते. नंतर घरात दीप लावले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचं फार महत्त्व आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews