Marathi News

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाला दाखवा पंचामृताचा खास नैवेद्य; पाहा रेसिपी…

Published:
तुळशी विवाहासाठी पंचामृत हा खास नैवेद्य दाखवतात, जो दूध, दही, तूप, मध आणि साखर किंवा गूळ यांपासून बनवला जातो. याशिवाय, तयार केलेले गोड पदार्थ आणि अन्न यांचाही नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाला दाखवा पंचामृताचा खास नैवेद्य; पाहा रेसिपी…

भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून पंचामृताचा प्रसाद अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना पंचामृत प्रसाद दिले जाते. हे पंचामृत बनवायला अगदी सोपे आहे.

साहित्य

  • अर्धा कप दूध
  • अर्धा कप दही
  • 1 चमचे मध
  • 1 चमचे साखर
  • 1 टीस्पून तूप
  • 1 तुळशीचे पान
  • सुका मेवा

कृती

  • पंचामृत प्रसाद बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही घ्या आणि चांगले फेटून घ्या.
  • त्यानंतर त्यात दूध घालावे. आता त्यात मध, आणि साजूक तूप टाका.
  • तुम्हाला हवे असल्यास त्यात गुलाबजल आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्सही टाकू शकता.
  • तयार केलेल्या पंचामृत प्रसादात तुळशीचे पान टाका आणि सर्व प्रथम ते पंचामृत तुळशीला अर्पण करा.
  • पूजा संपल्यानंतर पंचामृत प्रसाद म्हणून घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews