Marathi News

Diwali 2025 : दिवाळीत फटाके फोडताना हाताला भाजलंय; हे घरगुती उपाय करा

Published:
जर फटाके फोडताना किरकोळ भाजलं तर सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे भाजलेल्या जागी दहा मिनिटं तरी थंड पाणी सोडत राहावं. त्यामुळे त्या भागातली उष्णता बाहेर पडते आणि त्वचेचं नुकसान कमी होतं
Diwali 2025 : दिवाळीत फटाके फोडताना हाताला भाजलंय; हे घरगुती उपाय करा

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा पर्व. या सणात प्रत्येक घर झगमगून जाते, अंगणात सुंदर रांगोळ्या सजतात, आकाशात रंगीबेरंगी कंदील लुकलुकतात पण दिवाळी म्हटलं की फटाके फोडल्याशिवाय सण अपूर्णच वाटतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फटाके फोडायला आवडतात. विशेषत: या दिवशी लहान मुले फटाक्यांबद्दल उत्सुक असतात. मात्र, अनेकवेळा असे घडते की, फटाके फोडताना अपघात होतात. कोणताही गरम पदार्थ त्वचेवर पडला की, माणसाला असह्य वेदना आणि जळजळ जाणवते. बऱ्याच वेळा जळजळ झाल्यास त्वचेवर फोड येतात, त्यामुळे वेदना अनेक पटींनी वाढते. जेव्हा त्वचा जळते तेव्हा एखाद्या व्यक्तीला आराम मिळण्यासाठी काय करावे हे समजत नाही? अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने जळलेल्या त्वचेवर उपचार करू शकता…

थंड पाणी

शरीराचं जे भाग जळलं आहे, ते थंड पाण्याच्या खाली ठेवा. किमान 10-15 मिनिटांपर्यंत असं करत राहा. यामुळे शरीराला वेदना कमी होतील आणि फोड येण्याचा धोकाही कमी होतो.

जळलेल्या भागाला खाजवू नका

शरीराच्या ज्या भागाला भाजलं असेल, त्या जागेवर हातने खाजवू नये. यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो आणि त्वचा रोगही होण्याची शक्यता असते. त्वचेची जखम मोठी होऊ शकते.

नारळाचे तेल

फटाक्यामुळे तुम्ही भाजला असाल तर त्यावर नारळाचे तेल नारळाचे तेल लावा. नारळाच्या तेलात कुलिंग इफेक्ट असतो ज्यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळतो. तसेच जखम बरी झाल्यावरही तुम्ही त्यावर नारळाचे तेल लावले तर भाजलेले डाग सुद्धा निघून जातील.

बटाट्याचा रस

भाजलेल्या ठिकणी तुम्ही कच्च्या बटाट्याचा रस सुद्धा लावू शकता. हा रस खूप थंड असतो ज्यामुळे जळजळ शांत होते आणि आराम मिळतो.

कोरफड

कोरफडीने भाजलेल्या जागेचा कोरडेपणा जातो आणि मऊपणा येतो. अशावेळी ज्या जागेवर भाजले आहे तिथे कोरफड जेल लावा. त्वचा पूर्ववत होण्यास मदत मिळते आणि कोरफड जेल त्या जागेवर चिकटून न राहिल्यामुळे त्वचेला त्रासही होत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews