Marathi News

Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा उपवासाचे आप्पे, पाहा सोपी रेसिपी

Published:
उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही उपवासाचे आप्पे बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा उपवासाचे आप्पे, पाहा सोपी रेसिपी

उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे आप्पे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया उपवासाचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • १/२ कप साबुदाणा
  • १ कप वरई (भगर)
  • १ बटाटा
  • १/२ कप दही
  • १ हिरवी मिरची
  • ४ चमचे साखर
  • मीठ (चवीनुसार)
  • पाणी (आवश्यकतेनुसार)
  • तेल 

कृती

  • साबुदाणा आणि वरई (भगर) धुवून ४-५ तास किंवा पूर्णपणे भिजत ठेवा. बटाटा उकडून त्याची साले काढून त्याला किसून घ्या.
  • भिजलेले साबुदाणा आणि वरई (भगर) पाणी काढून घ्या. एका मोठ्या भांड्यात भिजलेले साबुदाणा, वरई, उकडलेला बटाटा, दही, मिरचीचे तुकडे, साखर आणि मीठ एकत्र करून चांगले मिसळा.
  • आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून आप्प्यासाठी घट्टसर पीठ तयार करा. मिश्रण फार पातळ होऊ नये.
  • आप्पे पात्राला थोडे तेल लावून गरम करा. तयार झालेले मिश्रण आप्पे पात्रात घाला.
  • आप्पे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या. गरज वाटल्यास झाकण ठेवून तुम्ही वाफवूनही घेऊ शकता.
  • उपवासाचे गरमागरम आप्पे दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews