बाळाचं नाव ठेवण्यासाठी अलिकडे पालक फार विचार करतात. नावाचा काही तरी चांगला अर्थ असावा अशी अनेकांची इच्छा असते. धार्मिक श्रद्धा असलेले बहुतांशी लोक एखाद्या देवाच्या नावावरून आधुनिक नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी श्रीराम, गणपती, विष्णू, हनुमान यांच्या विविध नावांना लोकांची पसंती असते. श्री गणेशाची काही नावे आपण जाणून घेऊ…
श्री गणेशाच्या नावावरून मुलांची नावे
- अनव : मानवतेचं दुसरं नाव म्हणजे अनव. तसेच दयाळु मनाच्या व्यक्तीला देखील अनव म्हटलं जातं. अनव नावाच्या व्यक्ती शांतीपूर्ण आयुष्य जगू शकतात.
- अन्मय : कोणत्याही विचित्र परिस्थितीमध्ये कमजोर न होणे. तसेच मानसिक स्वरुपातही कमजोर न पडणे हा अन्मय या नावाचा अर्थ होतो.
- ऋद्धेश : शांतीच्या देवतेला ऋद्धेश असे म्हणतात. श्री गणेश यांचं हे गोड नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.
- गौरीक : मुलांसाठी गौरीक हे फार सुंदर आणि हटके नाव आहे. श्री गणेश यांच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे.
- अवनीष : अ अक्षरापासून सुरु होणाऱ्या या नावाचा अर्थ होतो देव किंवा पृथ्वीचा राजा. श्री गणेश यांना या नावाने ओळखलं जातं.
- श्रीधर : लक्ष्मी आणि गणपतीची पूजा एकत्र केली जाते. ‘श्रीधर’ या नावाचा अर्थ ‘लक्ष्मीपती’ असा आहे, जो धन आणि समृद्धीशी संबंधित आहे.
- विघ्नेश : गणपतीला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात. विघ्नेश नावाचा अर्थ ‘अडथळे दूर करणारा’ असा होतो. हे नाव मुलाला धैर्य आणि शक्ती देईल.
- सुमुख : सुमुख या नावाचा अर्थ ‘सुंदर मुख असलेला’ असा आहे. हे नाव मुलाच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळे सौंदर्य आणेल.
- अथर्व : अथर्व हे नाव ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणजे अथर्व. चार वेदांमध्ये एक अथर्व वेद देखील आहे.
- अथेश : राजा, गणपती हा बुद्धीचा देवता म्हणजे राजा आहे
- अमोघ : अविश्वसनीय, गणरायाने बाप्पा अनेक अविश्वसनिय कामे केले आहेत.
- अवनिश : संपूर्ण जगाचा तारणहार करणारा
- इभान : हत्तीच्या मुखासमान दिसणारा गणपती
- रूद्रांश : रूद्राचा अंश, शंकराचा पुत्र गणपती
- ओजस : गणरायाप्रमाणे तेजस्वी
- कपिल : गणपतीचे हे नाव ज्ञानाचे प्रतीक आहे.
गणपतीच्या नावावरून मुलींची नावे
- गौरीशा : ‘गौरीशा’ म्हणजे ‘गौरीचा मुलगा’. हे नाव मुलीसाठी खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे.
- सिद्धी : ‘सिद्धी’ म्हणजे ‘सफलता आणि सिद्धीची देवी’. हे नाव गणपतीशी संबंधित आहे, कारण गणपती सिद्धीचे स्वामी आहेत.
- रिद्धी : ‘रिद्धी’ म्हणजे ‘समृद्धी आणि वैभवाची देवी’. ‘सिद्धी’ आणि ‘रिद्धी’ ही दोन्ही नावे मुलींसाठी उत्तम आहेत.
- गणिका : ‘गणिका’ या नावाचा अर्थ ‘समुहात सर्वात पुढे असलेली’ असा आहे. हे नाव आधुनिक आणि वेगळे आहे.
- श्रिया : हे नाव लक्ष्मीशी संबंधित आहे. ‘श्रिया’ नावाचा अर्थ ‘शुभ आणि मंगलमय’ असा आहे.
- एकशा : ‘एकशा’ हे नाव आधुनिक आणि खास आहे. याचा अर्थ ‘अद्वितीय’ किंवा ‘एकाच दृष्टीची’ असा होतो.
- सिद्धिका : ‘सिद्धिका’ म्हणजेसफलता देणारी’. गणपती सिद्धीचे स्वामी आहेत, त्यामुळे हे नाव मुलीसाठी उत्तम ठरेल.
- विदमही : हे भगवान गणेशाचे नाव आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






