Saphala Ekadashi 2025 : सफला एकादशीला करा ‘या’ वस्तूंचे दान, होईल विष्णूंची कृपा

Published:
सफला एकादशी नावाप्रमाणेच सर्व कार्यांमध्ये यश मिळवून देते. घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि धन-समृद्धी येते. या दिवशी व्रत केल्याने आणि दान केल्याने जीवनात सफलता मिळते अशी श्रद्धा आहे.
Saphala Ekadashi 2025 : सफला एकादशीला करा ‘या’ वस्तूंचे दान, होईल विष्णूंची कृपा

हिंदू धर्मात भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते. पौष महिन्यात येणारी एकादशी सफला एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूचे व्रत आणि पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान करणेही खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणते दान करणे शुभ आहे…

गुळाचे करा दान

सफला एकादशीला गुळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करतात, आरोग्य सुधारते आणि जीवनात यश, सुख-समृद्धी येते.

उबदार वस्त्रे

थंडीच्या दिवसात गरजू लोकांसाठी ब्लँकेट किंवा उबदार कपड्यांचे दान करणे खूप फलदायी ठरते. उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान केल्याने पुण्य मिळते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. पौष महिन्यात उबदार कपड्यांचे दान करणे खूप शुभ मानले जाते.

अन्नदान

सफला एकादशीला गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, जेणेकरून घरात धान्याची कमी भासणार नाही. तांदूळ, गहू, डाळ यांसारखे धान्य गरजू लोकांना द्यावे, जेणेकरून घरात धान्याची कमतरता भासणार नाही. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते.

पिवळी वस्त्रे

पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे दान केल्याने विष्णूची कृपा मिळते आणि गुरु ग्रह मजबूत होतो. याशिवाय ब्लँकेट, लोकर आणि इतर आवश्यक कपडे दान करता येतात. तसेच घरातील क्लेश दूर होऊन घरात आनंद टिकून राहतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews