हिंदू धर्मानुसार, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी-दैवतांना समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवस हा भगवान श्री गणेशाचा दिवस मानण्यात आला आहे. बुधवार हा वार गणपतीला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर बुधवारी काही विशेष उपाय केल्याने गणपतीची कृपा कायम राहते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….
उसाच्या रसाचा अभिषेक
आर्थिक समस्या असल्यास, बुधवारी गणपतीला उसाच्या रसाने अभिषेक करा. यामुळे गणपती लवकर प्रसन्न होतो. बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी उसाच्या रसाचा अभिषेक करणे हा एक प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि बुद्धी व समृद्धी येते.






