Habit of shaking legs : तुम्हालाही बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय आहे का? जाणून घ्या परिणाम

Published:
बसल्या जागेवर अनेकांना पाय हलवण्याची सवय असते. पण ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ जाणून घ्या. यामागे वैज्ञानिक कारणही आहेत.
Habit of shaking legs : तुम्हालाही बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय आहे का? जाणून घ्या परिणाम

अनेकांना बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते. ही सवय धार्मिक तसेच मानसिकदृष्टीने देखील चुकीची मानले जाते. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊयात की, पाय हालवणे शुभ असते की अशुभ असते….

पाय हालवणे शुभ असते की अशुभ? 

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार बसल्यावर पाय हलवणे हे अशुभ मानले जाते, कारण यामुळे चंद्र ग्रह कमजोर होतो, ज्यामुळे घरात तणाव, अनावश्यक खर्च आणि आरोग्य समस्या येऊ शकतात. तसेच, आरोग्याच्या दृष्टीनेही ही सवय चांगली नाही, म्हणून ही सवय टाळावी असे सांगितले जाते. 

घरात पैशाची कमतरता

पाय हलवल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. धनाची देवी माता लक्ष्मीच्या कोपामुळे धनाशी संबंधित कामात अडथळे येतात आणि भाग्यही साथ देत नाही.

जेवताना पाय हलवण्याची सवय

जेवताना पाय हलवणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि घरात धन-धान्याची समस्या निर्माण होते. अन्न खाताना पाय हलवण्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबातील सदस्यांवरही होतो.

मानसिक आणि शारीरिक कमकुवतपणा

बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्यानेही अनेक प्रकारचे आजार जन्माला येतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. याच्यामुळे झोप न लागणे, थकवा आणि इतर शारीरिक समस्या होऊ शकतात. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews