नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुरुवार, 1 जानेवारी रोजी गुरु प्रदोष व्रत आहे. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊयात…
गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे?
- सकाळी स्नान करून संकल्प घ्यावा. संध्याकाळी पुन्हा स्नान करून, स्वच्छ कपडे घालून पूजा करावी.
- शिवलिंगावर पंचामृत, पाणी, आणि गंगाजल अर्पण करावे.
- गंगेच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा, असे केल्याने ग्रहांची स्थिती सुधारते.
- ‘ॐ नमः शिवाय’, महामृत्युंजय मंत्र आणि गुरु मंत्रांचा (उदा. ॐ बृं बृहस्पतये नमः) जप करावा.
- पिवळ्या वस्तू, जसे की चणे, पिवळे वस्त्र, पुस्तके दान कराव्यात. यामुळे गुरु ग्रह बलवान होतो.
- सायंकाळी प्रदोष काळात (सूर्यास्तानंतरचा दीड तास) महादेव आणि माता पार्वतीची पूजा करावी.
- शक्य असल्यास दिवसभर उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा.
- दिवा लावून आरती करावी.






