Shattila Eekadashi : षटतिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

Published:
षटतिला एकादशीला विशेष महत्त्व आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. जाणून घ्या षष्टतिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
Shattila Eekadashi : षटतिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. नवीन वर्षातील पहिली एकादशी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते. या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हटले जाते. षष्टतिला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घेऊयात…

षटतिला एकादशीचे महत्व

षटतिला एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ज्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि ‘षट्’ (सहा) प्रकारे तिळाचा वापर (स्नान, उटणे, हवन, तर्पण, भोजन, दान) केला जातो, ज्यामुळे पाप नष्ट होऊन मोक्ष आणि समृद्धी मिळते, तसेच या दिवशी तिळाचे दान आणि विष्णू मंत्र जप महत्त्वाचा आहे. या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि त्यांची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

षटतिला एकादशीच्या दिवशी काय करावे ?

  • तिळाचे उटणे लावा, तिळमिश्रित पाण्याने स्नान करा, तिळाचे हवन करा, तिळाचे दान करा आणि आहारात तिळाचा समावेश करा.
  • भगवान विष्णूंची पूजा करा, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करा, विष्णू सहस्रनामाचे पठण करा आणि विष्णू कथा ऐका.
  • तीळ, धान्य, कपडे, पैसे गरजू लोकांना दान करा, यामुळे अक्षय पुण्य मिळते.
  • फलाहार घ्या किंवा सात्विक, कांदा-लसूण नसलेले अन्न खा.

षटतिला एकादशीच्या दिवशी काय करू नये?

  • लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी, मद्य यांचे सेवन करू नका.
  • एकादशीला तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.
  • तुळशीला पाणी घालू नका किंवा तुळशीची पाने तोडू नका, कारण या दिवशी तुळशी निर्जला व्रत करते.
  • खोटे बोलू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, मनात द्वेष किंवा ईर्ष्या ठेवू नका.
  • तुळशीच्या रोपाजवळ अस्वच्छता किंवा चप्पल ठेवू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews