Vastu Tips : सकाळी आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाणे का मानले जाते अशुभ? वाचा काय सांगते शास्त्र…

Published:
स्वयंपाकघरात काम करताना शारीरिक स्वच्छतेसोबतच मनाची स्वच्छताही महत्त्वाची आहे. शांत आणि आनंदी मनाने बनवलेले अन्न अधिक पौष्टिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारे असते.
Vastu Tips : सकाळी आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाणे का मानले जाते अशुभ?  वाचा काय सांगते शास्त्र…

भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून ते ‘अन्नपूर्णा देवी’चे मंदिर मानले जाते. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, सकाळी आंघोळ न करता स्वयंपाक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन कुटुंबाच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

अन्न अशुद्ध मानण्याचे कारण

धार्मिक ग्रंथांनुसार, अन्नाचा थेट संबंध आपल्या मनाशी असतो. आंघोळ न करता बनवलेले अन्न ‘तामसिक’ प्रवृत्तीचे मानले जाते. असे अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीच्या विचारांमध्ये नकारात्मकता येते आणि चिडचिड वाढते. शास्त्रानुसार, अशुद्ध हाताने अन्नाला स्पर्श करणे म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अनादर करण्यासारखे आहे.

वास्तू दोष आणि आरोग्य

वास्तुशास्त्रानुसार, जे लोक आंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश करतात, त्यांच्या घरात राहूचा प्रभाव वाढतो आणि बृहस्पति (गुरु) कमजोर होतो. यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात आणि विनाकारण कलह निर्माण होतात. आरोग्यदृष्ट्याही, स्नानानंतर शरीर शुद्ध झाल्यामुळे स्वयंपाकात स्वच्छता राखली जाते, जी कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असते. स्वच्छतेच्या अभावामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता असते, ज्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या कार्यक्षमतेवर होतो.

अन्नाचा मनावर परिणाम

अन्न अशुद्ध अवस्थेत किंवा नकारात्मक विचारांनी बनवले गेले, तर ते ग्रहण करणाऱ्या व्यक्तीच्या मनातही नकारात्मकता, आळस आणि चिडचिड वाढते.  वास्तुशास्त्रानुसार, घराचा केंद्रबिंदू असलेल्या स्वयंपाकघरात सात्विक वातावरण राखणे आवश्यक आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी स्वयंपाक करताना जप किंवा स्तोत्रे म्हणण्याची पद्धत होती, जेणेकरून अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

काय करावे?

  • स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • अन्न शिजवण्यापूर्वी पहिली पोळी गाईसाठी काढून ठेवावी.
  • स्वयंपाकघरात सकारात्मकतेसाठी शक्य असल्यास देवाची स्तोत्रे किंवा मंत्र लावावेत.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews