Marathi News

सूर्यास्तानंतर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

Published:
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे वर्ज्य केले आहे. असे केल्याने आरोग्याशी संबंधित समस्याच नाही तर आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
सूर्यास्तानंतर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि सणांना विशेष महत्त्व मानले जाते. ज्याप्रमाणे आपण देवी-देवतांची पूजा करतो, त्याचप्रमाणे सूर्य देवाची पूजा करणे खूप विशेष मानले जाते. असे बरेच लोक आहेत जे दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात. धार्मिक मान्यतेनुसार, असे करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या सर्व कामात यश मिळते. सूर्यास्तानंतर काही काम करणे वर्ज्य केले आहे. सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी करणे टाळायला पाहिजे, कारण वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी…

केस कापू नका

सूर्यास्तानंतर दाढी, नखे, केस कापणे टाळणे योग्य मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर हे काम केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सूर्यास्तानंतर केस आणि नखे कापल्यास नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

कपडे धुवू नये 

सूर्यास्तानंतर कपडे धुवू नयेत, ही एक सामान्य मान्यता आहे. असे मानले जाते की सूर्यास्त झाल्यावर कपडे धुऊन त्यांना उघड्या हवेत सुकायला ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि दरिद्रता येते.

तुळशीची पाने तोडणे टाळावे

सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडणे किंवा स्पर्श करणे टाळावे, असे मानले जाते. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, असे म्हटले जाते आणि संध्याकाळी तुळशीची पाने तोडल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते, ज्यामुळे घरात गरीबी येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यास घरात दरिद्रता येते. 

घर झाडू नये

हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते, असे मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीचा वास घरातून निघून जातो, असे म्हणतात. सूर्यास्तानंतर कचरा घराबाहेर न फेकू, कारण असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. ज्यामुळे घरात धनहानी होऊ शकते.

या वस्तू दान करू नये

सूर्यास्तानंतर काही वस्तूंचे दान करणे अशुभ मानले जाते. मीठ, दूध, दही, कांदा, लसूण, हळद, पैसे, इत्यादी वस्तू सूर्यास्तानंतर दान करू नये, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते किंवा देवांची कृपा कमी होऊ शकते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक समस्या येऊ शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews