महादेवाच्या पूजेत का अर्पण केलं जात नाही केतकी’चं फूल जाणून घ्या कारण

Published:
हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाला त्यांचे आवडते वस्तू आणि फुले अर्पण केली जातात, पण केतकी फूल शिवपूजेत वर्ज्य आहे.
महादेवाच्या पूजेत का अर्पण केलं जात नाही केतकी’चं फूल जाणून घ्या कारण

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. भगवान शिवाचे भक्त श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करतात, शिवलिंगाचा अभिषेक करतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात. पण केतकीचे फूल भगवान शंकराला का अर्पण करू नये याबद्दल जाणून घेऊया…

पौराणिक कथा

कथेनुसार, एकदा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. त्यावेळी भगवान शंकराने ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि सांगितले की जो कोणी या ज्योतिर्लिंगाचा आदि किंवा अंत शोधेल तो श्रेष्ठ ठरेल. खूप शोध घेतल्यानंतरही जेव्हा भगवान विष्णूंना शिवलिंगाचा अंत सापडला नाही, तेव्हा त्यांनी हार पत्करली आणि भगवान शंकरासमोर आपली चूक कबूल केली. ब्रह्माजी ज्योतिर्लिंगाचा अंत शोधण्यासाठी खाली गेले आणि केतकीचे फूल सोबत घेऊन आले. त्यांनी केतकीच्या फुलाला खोटे बोलण्यास सांगितले की, त्याने ज्योतिर्लिंगाचा अंत पाहिला आहे. भगवान शंकरांना सत्य माहिती असल्याने त्यांनी ब्रह्माजी आणि केतकीच्या फुलावर क्रोधित होऊन त्यांना शाप दिला की, यापुढे केतकीचे फूल माझ्या पूजेत वापरले जाणार नाही.

केतकीला शाप कसा मिळाला?

केतकीच्या फुलाला शंकराच्या पूजेसाठी शाप मिळाला, कारण त्याने ब्रह्मदेवाच्या खोट्या साक्षीला साथ दिली होती. हे ऐकून शिव क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला खोटे बोलल्याबद्दल शाप दिला की त्याची पूजा केली जाणार नाही. तसेच, केतकीच्या फुलालाही शाप दिला की ते शंकराच्या पूजेसाठी वापरले जाणार नाही, म्हणून, केतकीचे फूल शंकराच्या पूजेसाठी वापरले जात नाही. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews