Marathi News

पिंपळाचे पान बदलेल तुमचे नशीब, करा ‘हे’ उपाय

Published:
शनिवारी पीपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पीपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.असे संदर्भ मिळतात.
पिंपळाचे पान बदलेल तुमचे नशीब, करा ‘हे’ उपाय

कर्ज ही अशी गोष्ट आहे की एकदा माणूस त्यात अडकला की तो कायमचा त्रास सहन करतो. बऱ्याच वेळा, सर्व प्रयत्न करूनही त्याचे कर्ज फेडू शकत नाही. अशा परिस्थितीत, काही धार्मिक उपाय त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. हिंदू धर्मात पूजा, झाडे, वनस्पती यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना विशेष स्थान आहे. काही वनस्पती आणि झाडांना देव-देवतांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळ हे असेच एक झाड आहे जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या पानाचा उपाय करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया…

अडचणी दूर होतात

जर तुम्हाला नशीब बदलायचे असेल आणि जीवनातील अडचणी दूर करायच्या असतील, तर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसा पठण करणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. हनुमान चालीसा पठण केल्याने जीवनातील अडचणी आणि संकटे दूर होतात.

धनप्राप्तीसाठी

कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी उशीखाली पिंपळाचे पान ठेवून झोपणे हा एक उपाय आहे. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी हे पान उपयोगी आहे. पिंपळाचे पान घ्या. ते पान स्वच्छ करून घ्या. ते पान उशीखाली ठेवा आणि झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पान उचलून शिवलिंगाजवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. 

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी

पिंपळाचे पान नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि नशीब बदलण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते. दररोज सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाखाली बसून 108 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी.

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी

पिंपळाच्या पानाचे काही उपाय करून तुम्ही नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधू शकता. पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, त्याला जल अर्पण करणे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे यासारख्या गोष्टींमुळे नशीब आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल घडवता येतात. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि त्याला नमस्कार करावा. यामुळे शनिदेवाची कृपा होते आणि नोकरी-व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात. 

पिंपळाच्या झाडाखाली दिवा

शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि कामात यश मिळते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews