Marathi News

राम आणि कृष्ण तुळशी मध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर

Published:
कृष्ण तुळशीची पाने गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगातुळस ही हिंदू धर्मामध्ये आस्था, अध्यात्म आणि पवित्रतेचं प्रतिक आहे. मात्र हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे की, तुळशीमध्ये देखील दोन प्रकार आहेत.ची असतात. तर, राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असतो.
राम आणि कृष्ण तुळशी मध्ये काय आहे फरक? वाचा सविस्तर

शास्त्रानुसार तुळशीचे विविध महत्त्व आहेत. प्रामुख्याने तुळशीचे दोन प्रकार आहेत. ते म्हणजे राम आणि कृष्ण तुळस, असे तुळशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. दोन्हीचा रंग, नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्व वेगवेगळं आहे, आज आपण यातील फरक जाणून घेणार आहोत…

राम तुळस

राम आणि कृष्ण तुळस ह्या दोन तुळशीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. राम तुळशीला हिरवी पाने असतात. राम तुळशीची पाने हिरवीगार आणि चवीला गोड असतात. राम तुळस भगवान श्रीरामांना प्रिय आहे, राम तुळस संयम आणि विनम्रतेचे प्रतीक आहे. आणि राम तुळस घरामध्ये सुख-समृद्धीसाठी लावतात. राम तुळस सर्दी, खोकला आणि इतर श्वसनसंबंधी समस्यांवर गुणकारी आहे. राम तुळस धार्मिक कार्यांसाठी आणि पूजेसाठी वापरली जाते.

कृष्ण तुळस

कृष्ण तुळशीला जांभळ्या किंवा गडद रंगाची पाने असतात. धार्मिक दृष्ट्या, राम तुळस भगवान रामांशी संबंधित आहे, तर कृष्ण तुळस भगवान कृष्णाशी संबंधित आहे. कृष्ण तुळस ही श्रीकृष्णाची आवडती आहे. या तुळशीची पानं देखील कृष्णाच्या रंगासारखीच दिसतात. या तुळशीच्या पानांत फारसा गोडवा आढळत नाही.

घरात कोणती तुळस लावावी?

घरात कोणतीही तुळस लावणे शुभ असले तरी, वास्तुनुसार, राम तुळस अधिक शुभ मानली जाते. राम तुळस भगवान श्रीरामांना प्रिय आहे आणि ती घरात लावल्याने सुख, शांती आणि समृद्धी येते.  तुम्ही तुमच्या घरात राम किंवा कृष्ण तुळस लावू शकता. पण पूजेसाठी राम तुळस अधिक शुभ मानली जाते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews