Marathi News

कधी आहे वट पौर्णिमा? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त…

Published:
वटपौर्णिमा स्त्रियांच्या सौभाग्य आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या व्रताने त्यांना आध्यात्मिक आणि मानसिक शांती मिळते.
कधी आहे वट पौर्णिमा? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त…

वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, कारण वटवृक्षाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. पाहुयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे. जाणून घेऊयात तिथी, शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे.

कधी आहे वटपौर्णिमा?

वट पौर्णिमा यावर्षी 10 जून 2025 रोजी आहे. या दिवशी, स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यावर्षी वटपौर्णिमा 10 जून मंगळावर 2025 रोजी असेल. वट पौर्णिमा तिथी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुरु होईल. पौर्णिमा तिथी 11 जून बुधवार 2025 रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी संपेल.

वट पौर्णिमा शुभ मुहूर्त 

वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11  वाजून 55 मिनिटांनी सुरु होईल, आणि दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनपर्यंत असेल. या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे.

वटपौर्णिमेचे महत्व

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले. आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले. याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे.

व्रत आणि पूजा विधी 

वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करुन १६ श्रृंगार परिधान करावे. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ,आंबा, हळदी-कुंकू यांसारखे गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून ७ वेळा प्रदिक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. काही स्त्रिया या दिवशी उपवास ठेवतात, तर काही जण दिवसभर फळ किंवा दुधाचे सेवन करतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews