यंदा कधी आहे योगिनी एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त…

Published:
आषाढ कृष्ण एकादशी तिथीला योगिनी एकादशीचे व्रत केले जाते. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचे नाश होऊन पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
यंदा कधी आहे योगिनी एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त…

एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाच व्रत आहे, ज्याचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला विशेष प्रार्थना केली जाते. काही लोक दिवसभर पिवळे कपडे घालतात, जे खूप शुभ मानले जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी साजरी केली जाते. ही तिथी भगवान विष्णूंना प्रिय आहे, अशी मान्यता आहे. योगिनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या…

कधी आहे योगिनी एकादशी? 

योगिनी एकादशी तिथीपंचांगानुसार, आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 21 जून रोजी सकाळी 7:18 वाजता सुरू होईल आणि 22 जून रोजी पहाटे 4:27वाजता संपेल. उदयतिथीनुसार, योगिनी एकादशी शनिवार, 21 जून 2025 रोजी साजरी केली जाईल.

योगिनी एकादशी पूजा पद्धत

योगिनी एकादशीच्या दिवशी, सकाळी लवकर उठून स्नान करावे. पिवळे वस्त्र परिधान करा. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. भगवान विष्णूंना फुले, फळे, नैवेद्य (मिठाई, लाडू) अर्पण करा. धूप, दीप लावा. मंत्रांचा जप करा “ओम नमो भगवते वासुदेवाय”. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. एकादशी व्रतकथा वाचा किंवा ऐका. दिवसभर निर्जल किंवा फलाहार करून उपवास करा. संध्याकाळी पुन्हा विष्णूंची पूजा करा. ब्राह्मणांना भोजन द्या. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना जेवण द्या, नंतर उपवास सोडा. गरिबांना दानधर्म करा. या दिवशी उपवास करणे आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

योगिनी एकादशीचे महत्त्व

योगिनी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या व्रताचे पालन केल्याने 88 हजार ब्राह्मणांना भोजन देण्याइतके फळ मिळते, असे मानले जाते. एकादशीला दान करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करावे, ज्यामुळे पुण्य मिळते. 

तुळशी संबंधित ‘हे’ उपाय करा

योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे. धूप-दीप लावावा आणि ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 7 वेळा तुळशीची प्रदक्षिणा करावी, असे केल्याने घरात सुख-शांती नांदते. योगिनी एकादशीला तुळशीला 16 शृंगार अर्पण करणे शुभ मानले जाते, असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन-समृद्धी येते.  योगिनी एकादशीला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात शांतता नांदते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews