Marathi News

Bail Pola 2025 : यंदा कधी आहे बैलपोळा? साजरा करण्यामागील कारण काय? जाणून घ्या इतिहास

Written by:Smita Gangurde
Published:
महाराष्ट्र बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण साजरा केला जातो.
Bail Pola 2025 : यंदा कधी आहे बैलपोळा? साजरा करण्यामागील कारण काय? जाणून घ्या इतिहास

Bail Pola 2025 : महाराष्ट्र बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते, त्यांना सजवलं जातं, त्यांचे शिंग रंगवले जातात, चांगलं खायला दिलं जातं. सुंदर सजवलेल्या बैलांची पूजा केली जाते. या दिवशी घरात आवर्जुन पोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. यंदा हा सण २३ ऑगस्ट, शनिवारी साजरा केला जाणार आहे.

बैलांचं महत्त्व

आपली कृषी प्रधान संस्कृती आहे. आधुनिकीकरण वाढलं असलं तर आजही आपण बहुतांश शेतीवर अवलंबून असतो. त्यातही शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाला विशेष महत्त्व आहे. कष्टाच्या कामात बैल त्याचा साथीदार, सोबती असतो. या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो.

बैलपोळा साजरा करण्याची पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून बैलांना आंघोळ घातली जाते. यानंतर त्यांच्या अंगावर झूल चढवली जाते. त्यांच्या शिंगांना तेल तर काही शेतकरी रंग लावतात. बैलाला हळद-कुंकू लावून पूजा केली जाते. या दिवशी बैलांना काम करू दिलं जात नाही. या दिवशी त्यांना आराम दिला जातो. वर्षभर बैल कायम घाण्याला जुंपलेला असतो. या दिवशी मात्र त्याची सेवा करण्याची प्रथा आहे. त्याला चांगला खायाला दिलं जातं. काही ठिकाणी बैलांना सजवून त्यांनी मिरवणूक काढण्याची पद्धत आहे.

बैलपोळा देशभरात साजरा केला जातो. मात्र हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

महाराष्ट्र – बैलपोळा

कर्नाटक – करपोळा

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड – पोळा

तेलंगणा आणि आंध्रप्रदेश – पूळा पंडुग

 

 

 

 

 

Follow Us :GoogleNews