The right direction to place a money plant: वास्तु शास्त्र हे एक अतिशय प्राचीन शास्त्र आहे. वास्तु शास्त्राचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक समृद्धी येत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक घरामध्ये वास्तु नियमाचे पालन करून अनेक वस्तू ठेवतात. त्यातीलच एक म्हणजे मनी प्लांट होय. आजकाल अनेक लोक घरामध्ये, ऑफिसमध्ये मनी प्लांट लावतात. मनी प्लांटमुळे घरात सकारात्मकता येते तसेच सुखसमृद्धी मिळते.
परंतु मनी प्लांट घरात ठेवण्याचे काही वास्तु नियम आहेत. वास्तु नियमांचे पालन करून मनी प्लांट घरात ठेवल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. वास्तु नियमानुसार प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक योग्य दिशा आणि योग्य स्थान असते. त्यामुळे त्या वस्तू त्यात-त्या जागेवर ठेवणे गरजेचे असते. त्यामुळेच आज आपण मनी प्लांट मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे कि नाही याबाबत जाणून घेऊया….
मनी प्लांट घरात ठेवण्याचे वास्तु नियम-
-वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या उत्तर दिशेत लावणे अत्यंत चांगले असते. जर तुमचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेत येत असेल तर मनी प्लांट त्याठिकाणी लावू शकता.
-मनी प्लांट लावताना काळजी घ्या कि त्याची वेल वरच्या दिशेने वाढेल. तशी योग्य सोय करूनच मनी प्लांट लावा.
– घरामध्ये सुकलेले मनी प्लांट अजिबात ठेऊ नका. असे केल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात.
मनी प्लांट घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेऊ शकतो का?
वास्तु नियमानुसार, मनी प्लांट घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेऊ शकतो. मुख्य दरवाजाच्या उत्तर दिशेला मनी प्लांट ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नकारात्मकता दूर होते. शिवाय घरात आर्थिक सुखसमृद्धी येते. परंतु मनी प्लांटजवळ चप्पल, बूट, कचरा, मोडके-तोडके साहित्य अशा गोष्टी अजिबात ठेऊ नका. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा येण्यास अडचण येते.
मनी प्लांट लावण्याचे फायदे-
घरात मनी प्लांट लावल्याने सुखसमृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते. मनी प्लांट धन आणि सुखसमृद्धी आकर्षित करते. त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन पैसे येतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






