Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्यांचे नियम आजही लोकांना अडचणी मधून बाहेर पडून सुखीसमृद्ध आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित करतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात प्रत्येक गोष्टीबाबत अगदी बारकाईने सल्ले दिले आहेत. तसेच कोणत्या गोष्टी केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते आणि कोणत्या गोष्टी केल्याने फायदा होऊ शकतो याबाबतही सांगितले आहे.
आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये लोकांना समाजात कसे वर्तन करावे कसे वर्तन करू नये याबाबत सांगितले आहे. यामध्ये त्यांनी लोकांच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत ज्या त्यांना समाजात आदर मिळवून देण्यास अडचण निर्माण करतात. आज आपण चाणक्य नीतीनुसार कोणत्या लोकांना समाजात आदर आणि मानसन्मान मिळत नाही याबाबत जाणून घेऊया…..
दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक-
चाणक्य नीतीनुसार, दुसऱ्यांचा अपमान करणाऱ्या लोकांना समाजात कधीच आदर मिळत नाही. अशा लोकांना नेहमीच फटकारले जाते. काही लोक स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखतात. अशा लोकांना कोणीही जवळ करत नाही. या लोकांना समाजात मानसन्मान मिळत नाही.
सर्वांनाच मित्र बोलणारे लोक-
आचार्य चाणक्यांच्या मते समाजात असे काही लोक असतात जे सर्वांशीच मैत्री करतात. अशा लोकांना कोणीही खास नसतो. हे लोक फायदा दिसतील त्यांच्यासोबत जातात. अशा लोकांना समाजात अजिबात मानसन्मान आणि आदर मिळत नाही.
गोड-गोड बोलणारे लोक-
चाणक्य नीतीनुसार असे अनेक लोक असतात जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांसोबत गोड गोड बोलतात. असे लोक फक्त स्वतःचा फायदा बघत असतात. अशा लोकांना समाजात कोणीही मानसन्मान किंवा आदर देत नाही. अशा लोकांपासून सर्वजण दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
इतरांवर अवलंबून राहणारे लोक-
चाणक्य नीतीनुसार समाजात असे काही लोक असतात जे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून असतात. अशा लोकांना स्वतः काहीच काम होत नाही. असे लोक सतत दुसऱ्यांना कामे सांगत असतात. त्यांच्यावर कोणीही काहीही जबाबदारी देत नाही. असे लोक नेहमीच गटात राहून काम करतात. अशा लोकांना समाजात आदर मिळत नाही. लोक त्यांच्याशी मैत्री करायला संकोच करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






