Marathi News

Chanakya Niti For Husband Wife : फक्त या गोष्टी करा; नवरा बायकोचं नातं आणखी घट्ट होईल

Published:
विवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी, नाते मजबूत करण्यासाठी नवरा बायको ने कोणत्या नियमाचे पालन करावे याबाबत चाणक्यांनी केलेले लिखाण आज आपण जाणून घेऊया
Chanakya Niti For Husband Wife : फक्त या गोष्टी करा; नवरा बायकोचं नातं आणखी घट्ट होईल

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान रणनीतीकार आणि धोरणकर्ते मानले जातात. जीवनात यश मिळविण्यासाठी, आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणे हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांनी कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी मौल्यवान टिप्स दिल्या आहेत. नवरा बायकोचं नातं कसं असावं?? (Chanakya Niti For Husband Wife) एकमेकांबद्दल प्रेम कायम राहण्यासाठी काय करावे?? याबाबत चाणक्यांनी लिखाण केले आहे. विवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी, नाते मजबूत करण्यासाठी नवरा बायको ने कोणत्या नियमाचे पालन करावे याबाबत चाणक्यांनी केलेले लिखाण आज आपण जाणून घेऊया. चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीमधील नाते मजबूत करण्यासाठीच्या प्रमुख टिप्स जाणून घेऊया.

1) आदर –

आदर ही मोठी गोष्ट आहे. जर नातं जपायचं असेल तर एकमेकांचा आदर करणे अतिशय महत्त्वाचे आणि तितकंच गरजेचं असते. आचार्य चाणक्यांच्या मते जर पती-पत्नी एकमेकांचा आदर करत असतील तर कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते. नात्यात कितीही मतभेद निर्माण झाले तरी एकमेकांप्रती असलेला आदर पुन्हा ते नाते जुळवण्याची ताकद ठेवतो.

2) संवाद राखा – Chanakya Niti For Husband Wife

कोणतीही नातं मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांप्रती असलेला संवाद निर्णय भूमिका बजाऊ शकतो. आचार्य चाणक्यांच्या मते नवरा-बायकोतील नातं आणखी फुलवायचं असेल तर एकमेकांशी संवाद राखणे गरजेचे आहे. कारण जर संवादाचा अभाव असेल तर ते नाते कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे पती-पत्नींनी एकमेकांशी प्रत्येक लहान-साण गोष्टींबाबत एकमेकांशी चर्चा करावी, संवाद साधावा…  आपली मते एकमेकांसोबत शेअर करावी. म्हणजे नात्यात विश्वासही वाढतो आणि जवळीकही निर्माण होते.

3) संयम ठेवा

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की कोणतेही नाते टिकवून ठेवण्यासाठी त्याग आणि संयम आवश्यक आहे. सतत स्वतःच्या हट्टीपणावर जोर देणे किंवा जोडीदाराच्या कमतरतांवर बोट ठेवणे यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. त्याऐवजी, जोडीदाराच्या ताकदींना प्राधान्य दिले पाहिजे…. Chanakya Niti For Husband Wife

4) रागावर नियंत्रण ठेवा

चाणक्य नीतीनुसार, राग हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. पती-पत्नीमधील भांडणे स्वाभाविक आहेत, परंतु शब्दांवर नियंत्रण ठेवल्याने ते वाढण्यापासून रोखता येते. रागात बोललेले कठोर शब्द नात्यात दरी निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कितीही राग आला तरी तो शांत करण्याचा प्रयत्न करा.

5) एकमेकांच्या सुख-दुःखात भागीदार व्हा

आचार्य चाणक्यांच्या मते, खरा जीवनसाथी तो असतो जो प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहतो. सुख असो वा दुःख, पती-पत्नीने एकमेकांना आधार दिला पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार व्हायला पाहिजे…. तर आणि तरच नवरा बायकोचे नातं आणखी बहरेल.

6) विश्वास जपा –

विश्वास हा नात्याचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की जर पती-पत्नीमध्ये विश्वासाचा अभाव असेल तर ते नाते टिकू शकत नाही. म्हणून, तुमच्या जोडीदारावर संशय घेण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवा…..

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews