दिवाळीपूर्वी साजरा होणारा सण म्हणजे धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2025) …. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. धनत्रयोदशीला अनेकजण सोने चांदीची खरेदी करतात, तर काही जण नवीन गाडी विकत घेतात. परंतु तुम्हाला माहितेय का? धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू घरी आणणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागू शकते. या वस्तू कधी आहेत तेच आपण जाणून घेऊयात.
१) लोखंड आणि स्टीलपासून बनवलेल्या वस्तू
धनत्रयोदशीला (Dhantrayodashi 2025) धातू खरेदी करणे पारंपारिक आहे, परंतु लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. स्टील हे देखील लोखंडाचेच एक रूप आहे, म्हणून स्टीलची भांडी किंवा इतर वस्तू खरेदी करणे टाळावे. असे मानले जाते की लोखंड हा शनीचा कारक आहे आणि धनत्रयोदशीला ते खरेदी केल्याने घरात अघटित काही तरी घडू शकते.
२) काचेच्या वस्तू
काच राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो, म्हणून धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी कोणत्याही काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. काच देखील अस्थिरतेचे प्रतीक आहे. म्हणून, या प्रसंगी काचेची भांडी, मग तो आरसा असो किंवा सजावटीच्या वस्तू असो, जिथे जिथं काच दिसतेय त्या वस्तू खरेदी करणे टाळा, कारण धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतात.
३) टोकदार वस्तू
धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी चाकू, कात्री, पिन, सुया किंवा इतर कोणत्याही टोकदार वस्तूची खरेदी करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तू घरात दुर्दैव आणि नकारात्मकता वाढवतात आणि घराची आर्थिक भरभराट थांबते.
४) रिकामी भांडी
धनत्रयोदशीला भांडी खरेदी करणे खूप शुभ असते, परंतु घरी आणताना भांडी रिकामी नसतील याची खात्री करा. असे म्हटले जाते की रिकामी भांडी घरात आणली कि घर मोकळं होते. म्हणून, जर तुम्ही नवीन भांडी खरेदी केली तर ती घरी आणण्यापूर्वी ती तांदूळ, डाळ किंवा पाण्याने भरा. भरलेले भांडे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक असते.
५) काळे कपडे
हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. म्हणून धनत्रयोदशीला काळे कपडे खरेदी करणे टाळा.
धनत्रयोदशीचं महत्त्व- Dhantrayodashi 2025
धनत्रयोदशीला आरोग्याचे देव धन्वंतरी, संपत्तीसाठी देवी लक्ष्मी आणि समृद्धीसाठी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते, कारण हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरींच्या प्रादुर्भावाशी आणि आरोग्यासोबतच भौतिक संपत्तीचं महत्त्व दर्शवतो. या दिवशी घराची स्वच्छता करून दिवे लावले जातात, सोने-चांदीसारख्या वस्तू खरेदी केल्या जातात आणि यमराजासाठी दीपदान केले जाते, ज्यामुळे आरोग्याची व समृद्धीची भरभराट होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






