Marathi News

Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी रसमलाई, वाचा रेसिपी…

Published:
रसमलाई घरातील सगळ्यांचं खूप आवडते. रसमलाई बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे भाऊबीजेच्या आधल्या दिवशीची रसमलाई बनवून ठेवू शकता.
Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी रसमलाई, वाचा रेसिपी…

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला रसमलाई कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

रबडीसाठी
१ लिटर दूध
१/२ कप साखर
केशर आणि वेलची पूड
चिरलेले बदाम आणि पिस्ते
रसगुल्ल्यांसाठी
१ लिटर दूध
१/२ कप साखर (पाणी ६ कप)
२ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

कृती

रसगुल्ले तयार करा
दूध गरम करून त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून ते फाडून घ्या. पाणी वेगळे करून पनीरचे गोळे बनवा आणि त्यांना हलकेच चपटे करून घ्या.
पाक तयार करा
२ कप पाण्यात साखर मिसळून ते उकळवा. तयार झालेले रसगुल्ले या पाकात १० मिनिटे शिजवा आणि नंतर ते थंड होऊ द्या.
रबडी तयार करा
दुसऱ्या भांड्यात दूध उकळवून घ्या. त्यात साखर, केशर आणि वेलची पूड घालून ते घट्ट होईपर्यंत शिजवा.
रसमलाई बनवा
थंड झालेल्या रसगुल्ल्‍यांमधील जास्तीचे पाणी हलकेच दाबून काढून टाका आणि ते तयार केलेल्या रबडीत टाका.
थंड करा
५ मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि त्यात चिरलेले बदाम आणि पिस्ते घालून थंड झाल्यावर सर्व्ह करा.

टीप

रसगुल्ले तयार झाल्यावर ते लगेचच पाकात टाका, जेणेकरून ते तुटणार नाहीत.
तुम्ही तयार रसगुल्ले वापरून रसमलाई झटपट बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त रबडी तयार करून त्यात रसगुल्ले मिसळायचे आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews