Marathi News

Diwali 2025 : दिवाळी स्पेशल घरी बनवा मसालेदार कुरकुरीत बुंदी, ट्राय करा सोपी रेसिपी…

Published:
आज आम्ही तुम्हाला तिखट बुंदी कशी तयार करायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या…
Diwali 2025 : दिवाळी स्पेशल घरी बनवा मसालेदार कुरकुरीत बुंदी, ट्राय करा सोपी रेसिपी…

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येत आहे. हा दिव्यांचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.  हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे, जो लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. जवळपास दिवाळीचा फराळ बनवून तयार झाला आहे. अशात जर तुम्हाला आणखी काही चटपटीत करायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे. फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी कुरकुरीत तिखट बुंदी  चटपटीत आणि थोडीशी तिखट चव फारच छान लागते. अनेक लोकांना तिखट बुंदी विशेष आवडते.  तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग पाहूया तिखट बुंदी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ कप बेसन
  • १/४ कप तांदळाचे पीठ
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून हिंग
  • चिमूटभर बेकिंग सोडा
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल 

कृती

  • एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ एकत्र करा. 
  • थोडे थोडे पाणी घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा. गुठळ्या राहू नयेत याची काळजी घ्या. 
  • कढईत तेल गरम करा आणि तेलाचे तापमान तपासा. 
  • बुंदी पाडण्यासाठी बुंदीचा जाळीदार चमचा तेलाच्या वर धरा आणि चमच्याच्या छिद्रातून पिठाचे मिश्रण चमच्याने भरा. मिश्रण तेलात सोडा. 
  • बुंदी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. 
  • बुंदी कुरकुरीत करण्यासाठी मध्यम आचेवर तळा. 
  • तळलेली बुंदी एका कागदी टॉवेलवर काढून घ्या जेणेकरून जास्तीचे तेल निघून जाईल.
  • थंड झाल्यावर बुंदीमध्ये मसाले मिसळून खाण्यासाठी तयार करा.

टीप

  • बुंदी कुरकुरीत होण्यासाठी मिश्रणात तांदळाचे पीठ घालणे महत्त्वाचे आहे.
  • मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे. ते योग्य प्रमाणात असावे. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews