Diwali 2025 : दिवाळीनिमित्त कुत्र्यांची पूजा; कुठे आहे विचित्र परंपरा

Published:
या पूजेत, कुत्र्यांना प्रथम कुंकू लावून अभिषेक केला जातो, फुलांच्या हारांनी सजवले जाते आणि भाताचा आशीर्वाद दिला जातो.
Diwali 2025 : दिवाळीनिमित्त कुत्र्यांची पूजा; कुठे आहे विचित्र परंपरा

यंदाची दिवाळी (Diwali 2025) अगदी तोंडावर आली आहे. यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी आली. नवनवीन कपडे आले, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का?  असा एक देश आहे ज्याठिकाणी दिवाळीच्या दिवशी चक्क कुत्र्यांची पूजा केली जाते… चला तर मग याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया…..

आम्ही तुम्हांला ज्या देशाबद्दल सांगतोय त्या देशाचे नाव आहे नेपाळ…. होय, भारताच्या शेजारी असलेल्या या देशात दिवाळीच्या दिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते. कुत्र्यांची पूजा करणाऱ्या या परंपरेला कुकुर तिहार म्हणतात.  दिवाळीच्या (Diwali 2025) दुसऱ्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला कुत्र्यांची पूजा केली जाते. या पूजेत, कुत्र्यांना प्रथम कुंकू लावून अभिषेक केला जातो, फुलांच्या हारांनी सजवले जाते आणि भाताचा आशीर्वाद दिला जातो. त्यानंतर कुत्र्यांना त्यांचे आवडते अन्न दिले जाते. या परंपरेला कुकुर तिहार म्हणून ओळखले जाते. कुत्र्यांच्या निष्ठेचे स्मरण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

कुकुर तिहार का साजरा केला जातो? Diwali 2025

नेपाळमध्ये असे मानले जाते की कुत्रे हे यमराजाचे दूत आहेत. जर नरक चतुर्दशीला कुत्र्यांची पूजा केली तर यमराज प्रसन्न होतात आणि घरात अकाली मृत्यूची भीती राहत नाही. कुत्रे हे भैरवाचे वाहन देखील आहेत. नेपाळमध्ये भगवान कालभैरवाचे एक मोठे आणि प्रसिद्ध मंदिर देखील आहे. म्हणूनच नेपाळमध्ये लोक नरक चतुर्दशीला कुत्र्यांची पूजा करतात. Diwali 2025

कुत्र्यांशी संबंधित कोणत्या श्रद्धा आहेत?

शिवपुराणानुसार, यमराजाचे दोन कुत्रे आहेत, श्याम आणि शबल, जे मृत्युनंतर एखाद्या व्यक्तीला यमराजाकडे घेऊन जातात. महाभारतात, पांडवांची परीक्षा घेण्यासाठी यमराज स्वतः कुत्र्याचे रूप धारण करतात. देवांच्या कुत्र्याचे नाव सरम आहे. त्याचप्रमाणे, हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये कुत्र्यांना विशेष महत्त्व दिले जाते. कुत्र्याला माणसाचा सर्वात चांगला मित्र देखील म्हटले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews