Marathi News

Diwali 2025 : दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, जाणून घ्या रेसिपी!

Published:
यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली असेल. चला तर मग जाणून घेऊ या मखाण्यांचा चिवडा बनवण्याची रेसिपी....
Diwali 2025 : दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, जाणून घ्या रेसिपी!

प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळी सणाला घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मखाण्यांचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत….

साहित्य

  • मखाणा
  • सुका मेवा
  • लाल तिखट
  • मीठ
  • जिरं
  • सुकं खोबर
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • तेल
  • शेंगदाणे

कृती

  • कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात हळद आणि मखाणा टाकून भाजून घ्या.
  • त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा थोडस तेल टाकून कढीपत्त्याची पाने टाका. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे आणि काजू, बदाम टाकून व्यवस्थित भाजा. भाजून घेतलेले सर्व साहित्य काढून घ्या.
  • पुन्हा एकदा कढईमध्ये तेल टाकून त्यात मोहरी भाजून घ्या. नंतर त्यात भाजून घेतलेलं सर्व साहित्य टाकून व्यवस्थित करा.
  • भाजून घेतलेले मखाणा टाकून वरून लाल तिखट, मीठ आणि थोडीशी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेला चिवडा मोठ्या भांड्यामध्ये ओतून थंड करून बंद डब्यात भरून ठेवा.
  • तुमचा कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा तयार आहे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews