दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला समर्पित आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला येतो. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा असा हा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. भाऊबीजेला बहीण भावाला नारळ देण्यामागे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घ्या…
भाऊबीजेचा मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याशी संबंधित असलेला भाऊबीजेचा सण गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी होईल आणि २३ ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 46 मिनिटांपर्यंत असेल. यामुळे २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीचेचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी भावाला ओवाळण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी 1 वाजून 13 मिनिट ते 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत आहे.
भाऊबीजचे महत्त्व
भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिला भेटवस्तू देऊन तिच्या दीर्घायुष्यासाठी वचन देतो. हा सण कुटुंबातील प्रेम आणि बंध दृढ करतो.
भावाला नारळ देण्याचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार यमराज एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी त्याची बहीण यमुना हिच्या विनंतीवरून तिच्या घरी गेला होता. यावेळी यमुनेने तिच्या भावाला तिलक लावला, त्याला खाऊ घातल आणि नारळाची कवच भेट दिली. यानंतर यमराजांनी वचन दिले की ज्या बहिणी या दिवशी आपल्या भावांना तिलक लावतील आणि त्यांना नारळ भेट देतील, त्यांच्या भावांना दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी मिळेल. नारळ देण्यामागे भावाच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्याची भावना आहे. हिंदू धर्मातील कोणत्याही पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते आणि भाऊबीजच्या पवित्र सणाला त्याचे महत्त्व अधिक वाढते.






