Diwali Padwa Wishes : दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा हे शुभेच्छा संदेश

Published:
दिवाळी पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, हा दिवाळीचा तिसरा दिवस आहे जो अनेक कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो आणि या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराच्या विजयाचे स्मरण केले जाते.
Diwali Padwa Wishes : दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा हे शुभेच्छा संदेश

दिवाळी पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, हा दिवाळीचा तिसरा दिवस आहे जो अनेक कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो आणि या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराच्या विजयाचे स्मरण केले जाते. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. साहजिकच, पाडव्याच्या दिवशी अनेक जण नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेक जण एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवत (Diwali Padwa Wishes)असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रियजनांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊ इच्छित असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश सांगणार आहोत.

दिवाळी पाडव्याच्या खास शुभेच्छा – Diwali Padwa Wishes

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

आज बलिप्रतिपदा,दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा! Diwali Padwa Wishes

दिपावली पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावासत्याचा असत्यावरील विजय नेहमीच प्रेरणादायी ठरावा

सगळा आनंद, सगळे सौख्यसगळ्या स्वप्नांची पूर्तता,सगळे ऐश्वर्य आपणास लाभू देदिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास

खरेदीदारांसाठी खास दिवस

दिवाळी पाडवा हा शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, चांदे इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशी दागिन्यांची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीकडे भेटवस्तूची मागणी करते. आज बाजारात देखील सोन्याच्या नवनवीन वस्तू, दागिने पाहायला मिळत असतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews