तुमच्या बेडरूममध्येही बाथरूम आहे का? ‘या’ गोष्टी जाणून घ्या नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते

Published:
वास्तुशास्त्रात घर कसं असावं याबाबत बरेच नियम सांगितले गेले आहेत. कोणत्या दिशेला काय असावं याचे नियम आहेत. अटॅच बाथरूमबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत
तुमच्या बेडरूममध्येही बाथरूम आहे का?  ‘या’ गोष्टी जाणून घ्या नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते

जर आपण शहरांमधील घरांबद्दल बोललो तर आजकाल जवळजवळ सर्व घरांमध्ये बाथरूम आणि बेडरूम जोडलेले असतात म्हणजेच ते एकत्र असतात. अशा परिस्थितीत, वास्तुबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका राहतात. बऱ्याचदा अशा परिस्थितीमुळे घरात मोठे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. तुमच्या घरात अटॅच बाथरूम असल्यास कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी ते जाणून घेऊया….

बाथरूमची स्वच्छता

बेडरूममध्ये बाथरूम असणे हे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. जर बेडरूममध्ये बाथरूम असेल, तर बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, कारण अस्वच्छ बाथरूम वास्तु दोष निर्माण करू शकते. जर बाथरूम अस्वच्छ राहिले, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना निद्रानाश, आरोग्याच्या समस्या आणि संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो. बाथरूमची स्वच्छता राखल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कुटुंबाला लाभ मिळतो, असे वास्तुशास्त्र सांगते. 

झोपण्याची दिशा 

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमला अटॅच बाथरूम असल्यास, झोपण्याची दिशा आणि बाथरूमची जागा यावर लक्ष देणे आवश्यक आहे, कारण यामुळे घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रभावित होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमला अटॅच बाथरूम असेल तर झोपताना डोके बाथरूमच्या दिशेने नसावे. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

बाथरूमचा रंग

वास्तुशास्त्रानुसार, खोलीत अटॅच बाथरूम असल्यास बाथरूममध्ये हलके रंग वापरणे चांगले असते. क्रीम, पांढरा, पेस्टल निळा किंवा मऊ हिरवा यांसारखे रंग बाथरूमसाठी योग्य मानले जातात. हे रंग शांतता आणि सकारात्मकता दर्शवतात. जर तुम्ही बाथरूममध्ये फरशी लावत असाल तर त्या देखील हलक्या रंगाच्या असाव्यात, गडद रंगाच्या फरशी अशुभ मानल्या जातात आणि त्यामुळे आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात.

वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

वास्तुदोष दूर करण्यासाठी काचेच्या भांड्यात सेंधव मीठ भरून बाथरूममध्ये ठेवणे हा एक प्रभावी उपाय आहे. हे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. बाथरूममध्ये कमीत कमी एक आठवडा किंवा अधिक काळ हे मीठ ठेवल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews