Vastu Shastra to bring happiness and prosperity into the house: हिंदू धर्मानुसार आपल्या आयुष्यात वास्तू शास्त्राला विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की कोणतेही कार्य करताना वास्तू शास्त्राचे नियम पाळले कि कार्य शुभ आणि विना अडथळा पार पडते. शिवाय घरात सुख समृद्धी येते. परंतु हे नियम न पाळल्यास त्याचा त्रासुद्धा होऊ शकतो.
आज आपण घरात सुख समृद्धी आणण्यासाठी कोणते वास्तू नियम पाळायला हवेत याबाबत जाणून घेणार आहोत. वास्तू शास्त्राच्या मते, हे नियम पाळल्यास घरात सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच घरात सुखसमृद्धी येते.
घरात ‘या’ ठिकाणी लावा माता लक्ष्मीचा फोटो-
वास्तू शास्त्रानुसार दिशांना खूप महत्व असते. त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि धन येण्यासाठी एक खास नियम सांगण्यात आला आहे. या नियमानुसार घरात उत्तर दिशेला माता लक्ष्मीचा फोटो लावायला हवा. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. तसेच कमळावर बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो सर्वात जास्त शुभ समजला जातो.
याठिकाणी ठेवा स्वच्छ भांडी-
वास्तू शास्त्रानुसार, घरातील ईशान्य कोपऱ्याला किंवा उत्तर पूर्व दिशेला स्वच्छ भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवावे. या उपायामुळे घरात पैशांची आवक वाढते. तुम्हाला विविध परंतु योग्य मार्गाने पैसा प्राप्त होतो. तसेच बऱ्याच दिवसांपासून अडकलेला तुमचा पैसा तुम्हाला परत मिळण्यास मदत होईल.
घरात सुख-शांतीसाठी उपाय-
घरात सुख शांतीसाठी घरातील कर्त्या व्यक्तीने दररोज भगवान शिव आणि चंद्र देवाच्या मंत्रांचा जप केला पाहिजे. दररोज असे केल्यास घरात सुख शांती येते आणि प्रगती होते.
पैसे कमावण्यासाठी करा हा उपाय-
तुम्हालाही तुमच्या घरात पैसा यावा असे वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या घरात एक एक आरसा बसवावा. हा आरसा घरातील उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भिंतीवर असावा. परंतु आरसा कधीही मुख्य प्रवेशदाराजवळ असू नये.
घरात सकारात्मकता येण्यासाठी काय करावे-
तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात सकारात्मकता यावी तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोड्याची नाल बसवावी. परंतु लक्षात ठेवा त्याचे तोंड खालच्या दिशेला असावे.






