आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा होणारा दसरा (Dussehra 2025) म्हणजे हिंदूंचा प्रमुख सणांपैकी महत्वाचा सण…दसरा हा साडेतीन शुभ मुहुर्त्तांपैकी एक मानला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण आहे. सोने घ्या आणि सोन्यासारख रहा असे सांगणारा हा सण जगाची आई, देवी आदिशक्ती, माँ दुर्गा यांना समर्पित असतो. दसऱ्याच्या दिवशीच दुर्गामातेने नरकासुराचा वध केला hota तसेच प्रभू श्रीरामाने रावणाला अस्मान दाखवले होते. या दोन्ही घटनांची आठवण दसऱ्याला केली जाते. दश’ + ‘हरा’ म्हणजे दहा डोकी असलेल्या रावणाचा नाश; यावरूनच या सणाला ‘दशहरा’ हे नाव पडले. यंदा गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. आज आपण दसऱ्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
कधी आहे दसऱ्याचा शुभ मुहूर्त Dussehra 2025
यावर्षी दसरा गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. कॅलेंडरनुसार, विजयादशमी तिथी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०१ वाजता सुरू होते आणि २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:१० पर्यंत चालते. या वर्षी, दसऱ्याच्या दिवशी दुपारी १:२१ ते ३:४४ पर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जात आहे. या काळात पूजा, रावण दहन आणि इतर धार्मिक कार्ये केल्याने विशेष पुण्य आणि यश मिळते. रावण दहनासाठी प्रदोषकाल सर्वात शुभ मानला जातो. सूर्यास्ताचा वेळ सायं. ६.०५ वाजता असल्याने यानंतर रावण दहनाची सुरुवात करता येईल.
काय आहे दसऱ्याचे महत्त्व?
दसऱ्याच्या दिवशी (Dussehra 2025) अस्त्र-शस्त्रांची पूजा, महिषासुरमर्दिनी माता दुर्गेची आराधना आणि श्रीरामांची पूजा केली जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून १०-१५ फूटांपेक्षा जास्त उंचीच्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना जाळले जाते. परंतु मित्रांनो, दसरा हा फक्त रावण दहनाचा सोहळा नाही, तर चांगल्याचा वाईटावर होणारा विजय, नवीन सुरुवातींचा संकल्प आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा पूजा मंडळांमध्ये, महिला मिठाई अर्पण करून देवीबद्दल श्रद्धा व्यक्त करतात आणि एकमेकांना लाल सिंदूर लावून महिला सक्षमीकरण साजरे करतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






