Feng Shui Tips for Job Promotion: नोकरदार वर्गाला पगार आणि बढती या दोन गोष्टींची नेहमीच उत्सुकता लागून असते. प्रत्येक वर्षी आपल्याला पगारवाढसोबतच प्रमोशन मिळेल असे अनेकांना वाटत असते. परंतु अनेकांचा अपेक्षाभंग झालेला पाहायला मिळतो. बहुतेक लोक वर्षभर मेहनत आणि कष्ट करूनसुद्धा त्यांना हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे हे लोक निराश होतात. अशा परिस्थितीत त्यांची कामावरची एकाग्रता कमी होते तसेच कामातील रुचिही कमी होते.
तर अनेक लोक कार्यक्षेत्रात प्रगती आणि मनासारखे यश मिळवण्यासाठी रत्नशास्त्र, वास्तु शास्त्र यांसारख्या शास्त्रांचा आधार घेतात. अलीकडे आणखी एका शास्त्राची मदत घेतली जात आहे. हे शास्त्र म्हणजे फेंगशुई शास्त्र होय. फेंगशुई हे एक चिनी शास्त्र आहे.
चीन जपानसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून फेंशुई शास्त्राचा वापर केला जात आहे. अलीकडे आपल्या देशातसुद्धा फेंगशुई शास्त्र प्रचलित झाले आहे. फेंगशुई शास्त्रात ऑफिसमध्ये पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्यासाठी काही वस्तू ऑफिस डेस्कवर ठेवण्यास सांगितल्या आहेत. चला पाहूया या वस्तू कोणत्या आहेत….
लाफिंग बुद्धा-
फेंगशुईच्या अशा अनेक वस्तू आहेत ज्या जगभरात प्रसिद्ध आहेत. या वस्तू घराची शोभा वाढवण्यासोबतच अनेक वास्तु दोष दूर करण्यास मदत करतात. लाफिंग बुद्धा घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास कार्यातील अडथळे दूर होतात. ऑफिस डेस्कवर लाफिंग बुद्धा ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतात. कार्यक्षेत्रात बढती आणि पगारवाढ मिळण्यास मदत होते.
मनी प्लांट-
फेंगशुई शास्त्रामध्ये मनी प्लांटला विशेष महत्व आहे. अलीकडे घरापासून ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणी मनी प्लांट दिसून येतात. ऑफिसमध्ये डेस्कवर मनी प्लांट लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. कामात सकारात्मकता येते. तसेच कार्यक्षेत्रात नवीनवीन संधी उपलब्ध होतात. नोकरीत प्रमोशन मिळण्याची संधी प्राप्त होते. तसेच मनी प्लांट धन आकर्षित करण्यास मदत करते.
फेंगशुई ड्रॅगन-
ऑफिस डेस्कवर फेंगशुई ड्रॅगन ठेवणेसुद्धा अतिशय चांगले असते. फेंगशुई ड्रॅगन ठेवल्याने तुम्हाला नाव कमावण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात तुमची वाहवाह होईल. तुम्ही ज्याठिकाणी काम करता त्याच दिशेला तोंड करून फेंगशुई ड्रॅगन ठेवावे. व्यवसाय-उद्योग करणाऱ्या लोकांनी फेंगशुई ड्रॅगन ठेवल्याने चांगला नफा दिसून येईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






