Marathi News

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला प्रसादामध्ये बनवा रव्याचे मोदक, अगदी सोपी आहे रेसिपी

Published:
प्रत्येक घरात गणेश चतुर्थीमध्ये बाप्पासाठी मोदक आवर्जून बनवले जातात. यामध्ये उकडीचे आणि तळणीचे मोदक असे दोन पारंपरिक प्रकार असतात.
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला प्रसादामध्ये बनवा रव्याचे मोदक, अगदी सोपी आहे रेसिपी

Ganesh Chaturthi Special Recipe:     महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गणरायाचे आगमन झाले आहे. बाप्पा घरात विराजमान झाल्याने वातावरण अगदी प्रसन्न झाले आहे. सर्वत्र बाप्पांची आरती, बाप्पांची गाणी कानावर पडत आहेत. त्यामुळे मन अगदी आनंदी होते. घरच्या गृहिणी बाप्पासाठी वेगवगळे पारंपरिक प्रसादाचे पदार्थ बनवत आहेत. यामध्ये मोदक आवर्जून येते.

गणपती बाप्पाला गोड पदार्थ फार आवडतात. यामध्ये मोदक बाप्पाला सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक घरात गणेश चतुर्थीमध्ये बाप्पासाठी मोदक आवर्जून बनवले जातात. यामध्ये उकडीचे आणि तळणीचे मोदक असे दोन पारंपरिक प्रकार असतात. परंतु अलीकडे मोदकांचे अनेक प्रकार दिसून येत आहेत. लोक अनेक प्रकारचे आणि अनेक फ्लेवरचे मोदक बनवत आहेत. यामध्ये रव्याच्या मोदकाचादेखील समावेश होतो.

अनेक महिला नोकरी किंवा कामानिमित्त बाहेर पडत असतात. अशावेळी त्यांना गणेश चतुर्थीच्या १० दिवस नेमका कोणकोणता प्रसाद बनवायचा असा प्रश्न पडतो. अशावेळी त्या वेगवेगळ्या रेसिपीज शोधत असतात. आज आपण अशीच रव्याच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे. शिवाय मोदकही फारच चविष्ट बनतात. चला पाहूया रव्याच्या मोदकाची रेसिपी…

 

रव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

रवा- १ कप

तूप- गरजेनुसार

दूध- पाव कप

पिठीसाखर- १ कप

वेलचीपूड- पाव चमचा

ड्रायफ्रूट्स- बारीक चिरून

केशर- आवडीनुसार

मोदकाचे सारण बनवण्यासाठी साहित्य-

सुकं खोबरं- २ चमचे

गूळ- २ चमचे

ड्रायफ्रूट्स- बदाम, काजू, पिस्ता

 

रव्याचे मोदक बनवण्याची रेसिपी-

 

रव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत रवा घेऊन तो तुपामध्ये खरपूस भाजून घ्या.

आता त्यामध्ये केसर भिजवून ठेवलेले दूध घाला.

दूध घातल्यानंतर परत रवा काही मिनिटे भाजून घ्या.

आता या मिश्रणात पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून चांगले मिक्स करून घ्या.

नंतर या मिश्रणात ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून ठेवा.

आता खोबरे, काजू, बदाम, पिस्ते मिक्सरमध्ये बारीक करून त्यात गूळ घालून सारण बनवून घ्या.

आता मोदकाचा साचा घेऊन आधी त्यात रवा घाला नंतर हळुवार त्यात सारण घाला आणि पुन्हा रव्याने सारण बंद करा.

अशाप्रकारे तुमचे रव्याचे चविष्ट मोदक तयार आहेत.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews