Ganesh Chaturthi Naivedya Recipe: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. घरोघरी मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त भक्तिभावाने बाप्पाची सेवा करत आहेत. घरोघरी महिला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाप्पाचे आवडते पदार्थ बनवत आहेत. यामध्ये अनेक पारंपरिक पदार्थ पाहायला मिळतात.
गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे गणरायाच्या नैवेद्यात नेहमीच मोदक, खिरापत, खीर आणि श्रीखंडसारखे गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. महिलांना दररोज बाप्पाच्या नैवेद्यात कोणकोणते पदार्थ बनवायचे याचे वेध लागलेले असतात. यामध्ये श्रीखंडचे नाव आवर्जून घेतेले जाते. महाराष्ट्रात सणासुदीला श्रीखंड विशेष पाहायला मिळतो. बाप्पालासुद्धा श्रीखंडचा नैवेद्य दाखवला जातो.
अनेक महिलांना श्रीखंड घरी बनवता येत नाही. परंतु मार्केटसारखे श्रीखंड घरी बनवणे अगदी सोपे आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही अगदी सहजपणे घरीच श्रीखंड बनवू शकता. चला पाहूया श्रीखंडाची सोपी रेसिपी…
श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
दही- ५०० ग्रॅम
साखर- ३ ग्रॅम
वेलचीपूड
गुलाबजल
केशर
दूध- इच्छेनुसार
आयसिंग शुगर- १५० ग्रॅम
ड्रायफ्रूट्स- बारीक चिरून
श्रीखंड बनवण्याची पारंपरिक रेसिपी–
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम, दही घेऊन ते चांगले फेटून घ्यावे. दह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आता केशर घेऊन ते दुधामध्ये भिजवून बाजूला ठेवावे. केशरमुळे श्रीखंडला चांगला रंग येतो.
आता फेटलेल्या दह्यामध्ये आयसिंग शुगर, वेलचीपूड, साखर, गुलाबजल मिसळून एकजीव करावे.
नंतर त्यावर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले सजवावे.
अशाप्रकारे तुमचे घरचे श्रीखंड तयार आहे. हे तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊनही थंड करू शकता.
श्रीखंड खाण्याचे फायदे-
श्रीखंड हे दह्यापासून बनलेले असल्याने ते पोटाच्या समस्येवर अत्यंत गुणकारी असते. श्रीखंड खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
दही हा कॅल्शिअमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे दहापासून बनलेले श्रीखंड खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
श्रीखंड बराचवेळ पोट भरलेले ठेवते त्यामुळे आहारात श्रीखंड खाल्ल्याने जादाचे खाणे होत नाही.






