आज अवघ्या देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अवघ्या देशात तसा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा आज, बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे. श्री गणेशाच्या सेवेत सर्वजण या काळात मग्न असतात. त्यादृष्टीने काही महत्वपूर्ण बाबी जाणून घेणे या ठिकाणी महत्वाचे ठरते. आपल्या लाडक्या बाप्प्याची स्थापना, पूजेचा विधी आणि शुभ-मुहूर्त जाणून घेऊयात…
गणेश चतुर्थी 2025: महत्वाचे मुहूर्त
गणेश चतुर्थीचे महत्व नेमके काय?
त्यामुळे आतापासूनच गणेश चतुर्थीची तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा देवता असलेल्या गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. देशभरात गणेश चतुर्थीपासून 10 दिवस ‘गणेशोत्सव’ साजरा केला जातो. या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि आरतीसह बाप्पांची पूजा केली जाते.
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण असून तो विघ्नहर्ता, बुद्धीचा देवता आणि मंगलकारी श्रीगणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो. या दिवशी श्रीगणेशाची स्थापना करून भक्त मनोभावे पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करतात. गणेश हा प्रारंभी पूजला जाणारा देव मानला जातो, म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजेनेच केली जाते. गणेश चतुर्थीमुळे भक्तांमध्ये एकात्मता, भक्तीभाव आणि उत्साह वाढतो. समाजात बंधुभाव, सद्भावना आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे निसर्गसंवर्धनाचाही संदेश दिला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा सण आहे.
पूजा आणि आरतीचे महत्व आणि पद्धत
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.






