जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेचे पौराणिक महत्व काय? यात्रा किती दिवस असणार?

Written by:Astha Sutar
Published:
भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत सहभागी होऊन रथ ओढल्याने मोक्ष मिळतो, अशी भाविकांची धारणा आहे. ही यात्रा २७ जूनपासून ते ५ जुलै २०२५ पर्यंत असणार आहे. म्हणजे ९ दिवस ही यात्रा असणार आहे.
जगन्नाथ रथ यात्रेला आजपासून सुरुवात, यात्रेचे पौराणिक महत्व काय? यात्रा किती दिवस असणार?

Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्रमुख व धार्मिक उत्सवांपैकी भगवान जगन्नाथांची रथयात्रा एक महत्वाची यात्रा मानली जाते. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथ यात्रा आजपासून सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथ यात्रा कधीपासून सुरु होणार, असा सवाल भाविक विचारत होते. मात्र आजपासून या प्रसिद्ध यात्रेला सुरुवात झालेली आहे.

दरवर्षी आषाढ महिन्यात यात्रा…

दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा आयोजित केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान जगन्नाथांची रथयात्रा ओडिशातील पुरी येथे आजपासून सुरू झाली आहे. यावर्षी २७ जून २०२५ (शुक्रवार) पासून ही जगन्नाथ यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेच्या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर विराजमान असतात. ज्याला रथ महोत्सव आणि श्री गुंडीचा यात्रा असेही म्हणतात.

जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक

जगन्नाथ रथयात्रेचे विशेष महत्त्व आहे, या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर बसतात. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे, जे एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. जगभरातून भक्त या पवित्र यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात. भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत सहभागी होऊन रथ ओढल्याने मोक्ष मिळतो, अशी भाविकांची धारणा आहे. ही यात्रा २७ जूनपासून ते ५ जुलै २०२५ पर्यंत असणार आहे. म्हणजे ९ दिवस ही यात्रा असणार आहे.

यात्रेचं महत्व काय

पुराणानुसार आणि शास्त्रानुसार भगवान जगन्नाथाची बहीण सुभद्रा यांनी एक दिवस शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जगन्नाथ आणि बलभद्र त्यांच्या बहिणीला रथावर बसवून शहर दाखवण्यासाठी निघाले. या प्रवासादरम्यान, ते त्यांच्या मामी गुंडीचाच्या घरी गेले आणि तिथे सात दिवस मुक्काम केला. तेव्हापासून जगन्नाथ रथयात्रेची परंपरा सुरू झाली. म्हणून या यात्रेला विशेष धार्मिक महत्व असून, यात्रेला मोठी परंपरा लाभली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews