Marathi News

झोपताना उशीखाली ठेवा ‘ही’ वस्तू कधीच भासणार नाही कसली कमतरता

Published:
रात्री झोपताना उशीखाली स्वयंपाकघरातील 'ही' एक गोष्ट ठेवा, आयुष्यातील समस्या दूर होतील...
झोपताना उशीखाली ठेवा ‘ही’ वस्तू कधीच भासणार नाही कसली कमतरता

आनंद आणि समृद्धीसाठी, लोक उशीखाली वेगवेगळ्या गोष्टी ठेवून झोपतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि चांगली झोप येण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत जे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणतात आणि दुःखांपासून मुक्ती देतात. रात्री झोपताना उशीखाली स्वयंपाकघरातील एखादी वस्तू ठेवून झोपल्याने जीवनातील समस्यांवर मात करता येते. जर तुम्ही हा उपाय दररोज केला तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.

लसनाच्या पाकळ्या

रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवावी, जी खूप शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला रात्री वाईट स्वप्ने पडत असतील तर उशीखाली लसूण पाकळी ठेवून झोपा. यामुळे वाईट स्वप्ने थांबतील. अशा परिस्थितीत तुम्हाला भीती वाटणार नाही आणि तुम्ही शांतपणे झोपू शकाल. तुमच्या आसपास असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम लसून करतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

हळकुंड

जर कुंडलीत गुरु ग्रह दुर्बल असेल, तर हळकुंडाचा तुकडा उशीखाली ठेवावा. यामुळे नोकरीत प्रगती होते, व्यवसायात यश मिळते.

लाल चंदन

वास्तुशास्त्रानुसार झोपताना तुम्ही जर लाल चंदन तुमच्या उशिखाली ठेवले तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरातील दोष दूर होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews