सनातन धर्मात घरातील स्वयंपाकघर (Kitchen Vastu Tips) हे अन्नपूर्णा मातेचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ असावे याकडे गृहिणीचा कल असतो. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आणि माँ अन्नपूर्णेशी संबंधित अनेक नियमांबद्दल तपशीलवार सांगितले आहे. जर या नियमांचे उल्लंघन केले तर लक्ष्मीमाता दुःखी होते… लक्ष्मी माता नाराज झाल्याने राजाचाही रंग होण्यास वेळ लागत नाही.अशावेळी आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील 4 अशा गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत ज्याचे पालन केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर खुश राहील आणि तुमची आर्थिक भरभराट सुरू राहील.
1) स्वयंपाक घरातील साखर कधीही संपू नये – Kitchen Vastu Tips
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात साखर कधीही संपू नये. असे केल्याने अन्नातील गोडवा अनुभवता येत नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर स्नेह आणि शांती देखील संपू लागते. घरातील सदस्यांमध्ये शुल्लक गोष्टीवरून वाद विवाद होण्याची शक्यता असते.
2) स्वयंपाकघरात मीठ कधीही संपू नये?
धार्मिक विद्वानांच्या मते, स्वयंपाकघरात नेहमीच मीठ असले पाहिजे. मीठ हा असा पदार्थ आहे जो तुमच्या जेवणात चव आणतो जेवणात मीठ नसेल तर ते जेवणाला काहीच अर्थ राहत नाही… त्यातच मीठ म्हणजे साक्षात चंद्राचे प्रतीक..m चंद्राला धन आणि समृद्धीचा कारक मानले जाते. त्यामुळे जर घरातील मीठ संपले तर कुटुंबात संकटे येऊ लागतात. Kitchen Vastu Tips
3) स्वयंपाकघरातून हळद संपू देऊ नका –
हळदीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. स्वयंपाकघरात हळद असेल तर सकारात्मक ऊर्जा आणि शुभतेचा प्रसार करते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे भाग्य उजळते आणि बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते.
4) स्वयंपाकघरातून पाणी संपू नये
पाणी म्हणजे जीवन… जर एखाद्या ठिकाणी पाणी नसेल तर तेथे जीवन कधीही शक्य होणार नाही. म्हणून, स्वयंपाकघरात पाणी कधीही कमी पडून देऊ नका… जर असे केले नाही तर जीवन धोक्यात येऊ शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






