मित्रांनो, आज लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2025) आहे. या शुभ प्रसंगी, प्रत्येकजण अशी इच्छा करतो की देवी लक्ष्मी त्यांच्या घरात वास करील आणि त्यांच्या कुटुंबाला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देईल. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. काही लोक लक्ष्मी पूजा विधीपूर्वक करतात, परंतु पूजानंतर अशा चुका करतात ज्यामुळे देवी नाराज होते. अशावेळी लक्ष्मी पूजेनंतर काय करू नये ते जाणून घेऊया.
या चुका करू नका – Laxmi Pujan 2025
लक्ष्मी-गणेश मूर्ती काढून टाकणे:
लक्ष्मी पूजेनंतर लोक अनेकदा लगेच लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाकतात किंवा त्यांच्या पायथ्याशी असलेल्या वस्तू पॅक करण्यास सुरुवात करतात. परंतु, हे अशुभ मानले जाते. लक्ष्मीपूजनानंतर लगेच मूर्ती काढू नयेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या मूर्ती काढाव्यात.
अपमान आणि कटू शब्द
लक्ष्मी पूजेनंतर, मन शांत होते. म्हणून, पूजा केल्यानंतर अपमान करणे, वाईट बोलणे किंवा रागावणे हे अशुभ मानले जाते. पूजानंतर खोटे बोलणे टाळावे. कोणाच्या भावना दुखावतील असे बोलू नका. Laxmi Pujan 2025
मद्य आणि खारट पदार्थ:
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर मांस किंवा मद्यपान टाळा. असे केल्याने मन आणि शरीराची शुद्धता नष्ट होते. म्हणून, पूजेनंतर खारट पदार्थ किंवा तामसिक पदार्थ देखील टाळावेत.
नखे किंवा केस कापणे:
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर, शरीर एका विशेष उर्जेने भरलेले असते. अशावेळी नखे किंवा केस कापणे नकारात्मकता आणू शकते. म्हणून, दिवाळीच्या पूजेनंतर लगेच नखे कापू नयेत.
भिक्षू ना हाकलून लावणे
जर तुम्ही लक्ष्मी पूजा केली असेल आणि त्यानंतर कोणीही तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आला तर तुम्ही त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये.
लक्ष्मीपूजन करण्यासाठी अडीच तासाचा वेळ : Laxmi Pujan 2025
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी संपणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे. यादिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता. यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






