Marathi News

नारळी पौर्णिमेनिमित्त बनवा ओल्या नारळाचे लाडू, पाहा सोपी रेसिपी

Published:
यंदा नारळी पौर्णिमेनिमित्त काहीतरी गोड बनवणार असाल तर त्यासाठी नारळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा.
नारळी पौर्णिमेनिमित्त बनवा ओल्या नारळाचे लाडू, पाहा सोपी रेसिपी

 Narali purnima 2025:   आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला काहीतरी गोड पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण आहे. यंदा नारळी पौर्णिमेनिमित्त काहीतरी गोड बनवणार असाल तर त्यासाठी नारळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा.

 

नारळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य-

 

२ वाट्या नारळ पावडर
१ वाटी मावा (जर उपलब्ध नसेल तर तुम्ही मिल्कमेड वापरू शकता)
४ चमचे पिठीसाखर
वेलची पूड
बारीक चिरलेले पिस्ता

 

नारळाचे लाडू बनवण्याची रेसिपी-

 

सर्वप्रथम नारळाच्या लाडूसाठी सर्व साहित्य एकत्र करा. आणि साखर बारीक करा.

गॅस चालू करा आणि एका पॅनमध्ये नारळाची पूड मंद आचेवर सुमारे १ मिनिट तूप न घालता भाजून घ्या. नारळात नैसर्गिक तेल असल्याने, तूपाची आवश्यकता नाही.

भाजताना नारळाच्या पूडचा रंग बदलू नये. आता खवा (मावा) मंद आचेवर सुमारे २ मिनिटे भाजून घ्या आणि थोडा थंड होऊ द्या.

आता दोन्ही साहित्य मिसळा आणि त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला आणि मिश्रण मुठीत घ्या आणि गोल लाडू बनवा.

आता  नारळाच्या पूडवर लाडू ठेवा आणि नारळाच्या पूडने गुंडाळा. नारळाच्या लाडूवर चिरलेला पिस्ता घाला. अशाप्रकारे नारळाचे लाडू तयार आहेत.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews